जगभरात ज्यांनी स्वतःच्या अभिनयाची प्रेक्षकांवर विशेष छाप पाडली, उत्तम काम केलं आणि एक मराठमोळी अभिनेत्री जगाच्या पाठीवर जाऊन पोहचली ती म्हणजे छाया कदम. गेल्या काही वर्षांपासून छाया कदम यांनी आपल्या कमालीच्या अभिनयाने स्वतःचं वेगळं पण सिद्ध केल्याचे आपण पाहिले. एकापेक्षा एक असे उत्तम प्रोजेक्ट्स करत त्यांनी बॉलिवुड गाजवलं. यानंतर आता महिला दिनादिवशी छाया कदम या एका मोठ्या ज्वेलरी ब्रँडसाठी महत्त्वपूर्ण चेहरा बनल्या आहेत.
View this post on Instagram
खरंतर सध्या मोठ्या मोठ्या ब्रँड्सना देखणी आणि मॉर्डन असलेली अभिनेत्री ब्रँड अँबेसेडर म्हणून लागते. पण हा विचार मोडून काढत छाया कदम एका मोठ्या ब्रँडचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग झाल्या आहेत. ज्वेलरी ब्रँड म्हटलं की, सगळ्यांना डोळ्यासमोर एखादी मोठी अभिनेत्री किंवा मॉडेल दिसते. पण यंदाच्या महिला दिनाच्या निमित्ताने छाया कदम या त्यांच्या अभिनयाचं सोनेरी रूपाने या ब्रँडचा खास चेहरा झाल्या आहेत.
छाया कदम हे नाव केवळ भारतात नव्हे तर साता समुद्रापारसुद्धा तेवढ्याच ताकदीने घेतलं जातं. त्यांच्या अभिनयाचं वेगळेपणं सगळ्यांना आपसूक मोहून टाकणारं आहे. छाया कदम यांनी आजवर अनेक महत्त्वपूर्ण भूमिका अगदी ताकदीने पार पाडल्या. त्यांनी बॉलिवुडच्या सोबतीने जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच आता जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने छाया कदम हा चेहरा पुन्हा एकदा चर्चेत आला आणि एका बड्या ज्वेलरी ब्रँडचा महत्त्वपूर्ण भाग झाला आहे. यानिमित्त सोशल मीडियावर त्यांचे चाहते आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
हेही पहा –