‘लपाछपी’ या मराठी भयपटाचा हिंदी रिमेक ‘छोरी’ ॲमेझॉन प्राइमवर पाहता येणार

हा सिनेमा २६ नोव्हेंबर रोजी प्राइम व्हिडिओजवर प्रदर्शित होणार असून २४० देश- प्रदेशांसह जगभरात पाहाता येणार

Chhorii horror movie release in amazon prime video on 26 november
'लपाछपी' या मराठी भयपटाचा हिंदी रिमेक 'छोरी' अॅमेझॉन प्राइमवर पाहता येणार

ऑक्टोबरच्या सुरुवातीला प्राइम व्हिडिओजने छोरी या आपल्या आगामी थरारपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करत प्रेक्षकांना अनोखी पर्वणी दिली. आज परत ‘छोरी’च्या विश्वाची झलक दाखवणाऱ्या टीझरचे अनावरण करण्यात आले. लपाछपी या मराठी भयपट सिनेमाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये साक्षी म्हणजेच अभिनेत्री नुसरत भरूचा मुख्य भूमिकेत आहे. तिचा  शहरातून निर्जन बेटाकडे होणारा प्रवास दाखवण्यात आला आहे. ज्या दरम्यान तिला अमानवी घटनांचा अनुभव येतो. हा सिनेमा २६ नोव्हेंबर रोजी प्राइम व्हिडिओजवर प्रदर्शित होणार असून २४० देश- प्रदेशांसह जगभरात पाहाता येणार आहे. टीझरमध्ये हादरवून टाकणारा थरार अनुभवायला मिळतो आणि त्यातूनच पुढे काय होणार याची कल्पना येते. गावात घडणाऱ्या नाट्यमय प्रसंगामागचे रहस्य ती अनुभवते आणि त्यामुळे छोरी पाहणे आणखी औत्सुक्याचे होते.

विशाल फुरिया दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्णन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हिस आणि शिखा शर्मा यांची निर्मिती असलेला छोरी हा लपाछपी या मराठी सिनेमाचा रिमेक असून त्यात नुसरत भरूचा प्रमुख भूमिकेत आहे. त्याशिवाय मीता वशिष्ठ, राजेश जैस, सौरभ गोयल आणि यानिया भारद्वाज यांच्याही भूमिका आहेत. थरार, उत्कंठा यांचे अनोखे मिश्रण असलेला, खिळवून ठेवणारा हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

लपाछपी हा मराठीत उत्तम भयपट म्हणून पाहिले जाते. या सिनेमात अभिनेत्री पूजा सावंत ही मुख्य भूमिकेत होती. पूजाच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतला लपाछपी हा सिनेमा अत्यंत वेगळा ठरला. सिनेमासाठी पूजाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्याचप्रमाणे अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांसाठी लपाछपी या भयपटाचे नाव होते. एका मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक होणे हे मराठी सिनेमाचे श्रेय आहे. लपाछपी प्रमाणेच छोरी हा सिनेमा देखील प्रेक्षकांना आवडेल यात काही शंका नाही.


हेही वाचा – वाढदिवसानिमित्त सुबोध भावेंची चाहत्यांना खास भेट ; ‘फुलराणी’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित