घरमनोरंजन'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,' लहानग्या परीचा आषाढी एकादशी निमित्त खास व्हिडीओ

‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,’ लहानग्या परीचा आषाढी एकादशी निमित्त खास व्हिडीओ

Subscribe

आषाढी एकादशी निमित्ताने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील बालकलाकार मायरा(mayra) म्हणजेच परी हिने सुद्धा प्रेक्षकांना शुभेच्छा देताना खास व्हिडीओ सुद्धा पोस्ट केला आहे.

‘भेटी लागी जीवा लागलीसे आस’ म्हणत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत अखेर पंढरपूर(pandharpur) मध्ये पोहोचले. सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकरी सुद्धा आतुर झाले होते आणि आज अखेर आषाढी एकादशीच्या दिवशी(ashadhi ekdashi) विठुरायाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातच भक्तीमय वातावरण झाले आहे. आजच्या एकादशीच्या निमित्ताने अनेक कलाकार विविध पोस्ट शेअर करत आहेत. त्याचप्रमाणे आषाढी एकादशी निमित्ताने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील बालकलाकार मायरा(mayra) म्हणजेच परी हिने सुद्धा प्रेक्षकांना शुभेच्छा देताना खास व्हिडीओ सुद्धा पोस्ट केला आहे.

हे ही वाचा –  ‘कुछ कुछ होता है’च्या सिक्वेलमध्ये करण जौहरची ड्रीम कास्ट

- Advertisement -

झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ(majhi tujhi reshimgath0 ह्या मलिकतेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील सर्वकलाकार आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. याच मालिकेत परीची भूमिका साकारणारी मायरा महाराष्ट्राची लाडकी बनली आहे. तिच्या गॉड आणि निखळ स्वभावामुळे तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच मायराने आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक खास व्हिडीओ पोस्ट करत. सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – लेडीज स्पेशल बस, सुबोध भावेचा नवा कार्यक्रम लवकरच

मायरा ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा करताना दिसते आहे. त्याचसोबत तुळस डोक्यावर घेऊन चालताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने रखुमाई रे रखुमाई असे कॅप्शन सुद्धा दिले आहे.

हे ही वाचा –  ‘कॉफी विथ करण’ शो एवढा हिट का होतो? करण जोहरने सांगितले कारण

त्यांनतर मायराने सर्व प्रेक्षकांनासाठी सर्व प्रेक्षकांसाठी आशीर्वाद सुद्धा मागितला. ” पाणी घालते तुळशीला, वंदन करत देवाला, सुखी ठेव माझ्या सर्व मित्रांना,” असं मायराने म्हटलं आहे. त्याचसोबत ”जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा असं कॅप्शन सुद्धा मायराने दिले आहे. मायराच्या या निरागस प्रार्थनेने सर्वांचंच लक्ष वेधन घेतलं आहे.

हे ही वाचा – अनुपम खेर यांनी केली त्यांच्या ५२६ व्या चित्रपटाची घोषणा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -