चिरंजीवीचा ‘गॉडफादर’ आता ओटीटीच्या ‘या’ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेचा चिरंजीवीचा ‘गॉडफादर’ चित्रपट 5 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता हाच चित्रपट ओटीटीवर देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यामुळे 19 नोव्हेंबर रोजी या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आलं. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम भाषेतील लूसिफर या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘गॉडफादर’ नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. नव्या नियमानुसार आता चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला चित्रपट चार आठवड्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित केला जाऊ शकतो.

या चित्रपटात चिरंजीवी आणि सलमान खान व्यतिरिक्त अभिनेत्री नयनतारा आणि सत्य देव सुद्धा असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानने, चिरंजीवीच्या या चित्रपटात काम करण्यासाठी कोणतही मानधन घेतलेलं नाही. चिरंजीवीने एका इंटरव्यूमध्ये सांगितलं होतं की, तो आणि सलमान चांगले मित्र आहेत. दोघांची मैत्री एका जाहिरातीच्या शूट दरम्यान झाली. मुंबईमध्ये गेल्यावर तो सलमानच्या घरीच थांबतो.

या चित्रपटांमध्ये देखील दिसणार सलमान खान
‘गॉडफादर’ चित्रपटाव्यतिरिक्त सलमान खान ‘Tiger 3’ चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होईल. या व्यतिरिक्त तो शाहरूखच्या ‘पठाण’ चित्रपटात देखील दिसेल.

 


हेही वाचा :

किरणबाला सचदेव उर्फ तबस्सुम- अबाधित स्मितहास्य !