घरमनोरंजनआपल्या लेकी-बाळींच्या समोर असे आदर्श... चित्रा वाघ उर्फीवर पुन्हा संतापल्या

आपल्या लेकी-बाळींच्या समोर असे आदर्श… चित्रा वाघ उर्फीवर पुन्हा संतापल्या

Subscribe

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. या ट्रोलर्सला उर्फी नेहमीच सडेतोड उत्तर देतान दिसते. याच कारणामुळे अलीकडच्याच काळात उर्फीच्या कपड्यांवरुन पोलिस तक्रार देखील करण्यात आली होती. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांपासून भाजपा नेत्या चित्रा वाघ देखील उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन सतत संताप व्यक्त करत आहेत. शिवाय उर्फी देखील त्यांच्या विरोधाला सडेतोड उत्तर देत आहे.

मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या चित्रा वाघ आणि उर्फीच्या वादाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात आणखी ट्वीट एक केलंय.

- Advertisement -

ज्यात त्यांनी लिहिलंय की, “आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो, सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं,हा ही धर्म नाही का ? लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का ?” असं चित्रा वाघ यांनी ट्वीट मधून म्हटलं आहे. आता वाघ यांच्या ट्वीटवर उर्फी नक्की प्रतिक्रिया देईल.

- Advertisement -

या ट्वीटशिवाय सोमवारी देखील चित्रा वाघ यांनी उर्फीबाबत संताप व्यक्त केला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, “मला तर ही उर्फट बाई कोण आहे हे माहीतही नाही, ज्या पध्दतीने नंगानाच सुरू आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही बाई मला ज्या दिवशी सापडेल त्या दिवशी थोबाड रंगवेन” चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यानंतर उर्फीने देखील दिल्लीतील कंझावाला अपघातातील एक व्हिडीओ शेअर करत, “पोलिस एक अपघात म्हणून या प्रकरणाचा तपास करत होते. ते नराधम तिला 12 किलो मीटरपर्यंत फरफटत घेऊन गेले, तिची हाडं मोडली होती, तिच्या अंगावर कपडे नव्हते. चित्रा वाघ या घटनेतील एक आरोपी तुमच्याच पक्षाशी संबंधित आहे. मला तुम्हाला इथे आवाज उठवताना बघायला आवडेल,”असं उर्फीने म्हटलं होतं.

 


हेही वाचा :

तुम्हाला इथे आवाज उठवताना बघायचंय… चित्रा वाघ यांना उर्फीचे ‘त्या’ घटनेवरून प्रत्युत्तर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -