चित्रा वाघ पुन्हा चवताळल्या; व्हिडीओ शेअर करत महिला आयोगाला विचारला जाब

chitra wagh reaction on sanjay rathod clean chit uddhav thackeray dilip walse patil

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. या ट्रोलर्सला उर्फी नेहमीच सडेतोड उत्तर देतान दिसते. याच कारणामुळे अलीकडच्याच काळात उर्फीच्या कपड्यांवरुन पोलिस तक्रार देखील करण्यात आली होती. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांपासून भाजपा नेत्या चित्रा वाघ देखील उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन सतत संताप व्यक्त करत आहेत. शिवाय उर्फी देखील त्यांच्या विरोधाला सडेतोड उत्तर देत आहे.

मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या चित्रा वाघ आणि उर्फीच्या वादाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. नुकत्याच काही तासांपूर्वी उर्फीने चित्रा वाघ यांना चित्रू असं म्हणत डिवचलंय. दरम्यान, आता चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पुन्हा एक ट्वीट केलंय.

चित्रा वाघ यांचा महिला आयोगाला जाब

चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ शेअर करत महिला आयोगाला जाब विचारला आहे. शिवाय खाली ट्वीटमध्ये लिहिलंय की, “भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब ?विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ? महिला आयोगाची भाषा नकोय कृती हवी. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. @Maha_MahilaAyog समर्थन करतंय का ? आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ?” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

 


हेही वाचा :

चित्रा वाघ यांना ‘चित्रू’ म्हणत उर्फीने पुन्हा डिवचलं