Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सुप्रसिद्ध कोरिओग्राफर धर्मेशला कोरोनाची लागण

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर धर्मेशला कोरोनाची लागण

आपल्या दमदार डान्सच्या जोरावर छोट्या पडद्यावर पदार्पण केलेला धर्मेश येलांडे याने सिनेसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Related Story

- Advertisement -

आपल्या दमदार डान्सच्या जोरावर छोट्या पडद्यावर पदार्पण केलेला धर्मेश येलांडे याने सिनेसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या तो ‘डान्स दिवाने ३’ या शो चे परिक्षक म्हणून काम करत आहे. धमाकेदार परफॉर्मन्समुळे ‘डान्स दिवाने ३ ‘ची सगळीडेच चर्चा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शो च्या सेटवरील धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘डान्स दिवाने ३’ च्या सेटवरील १८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान आता परिक्षक धर्मेश येलांडेल देखील कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by D 👽 (@dharmesh0011)

 ‘डान्स दिवाने ३’ या शोमध्ये धर्मेशसोबत माधुरी दिक्षित आणि तुषार कालिया हे देखील परिक्षक होते. तर राघव जुयाल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचा. मात्र आता धर्मेशला कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर माधुरी आणि तुषार यांनी कोरोनाची टेस्ट केल्यानंतर ती नेगेटिव्ह आली आहे. धर्मेशला कोरोना झाल्यची माहिती ‘डान्स दिवाने ३’च्या निर्मात्यांनी दिली होती. त्यामुळे आगामी काही दिवस धर्मेश शो मध्ये दिसणार नाही आहे. गेल्या काहीकाळापासून बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यात रणबीर कपूर, आर. माधवन, मनो वाजपेयी, कट्रिना कॅफ, विकी कौशल, आलिया भट्ट, अक्षय कुमार, गोविंदा, भूमी पेडणेकर या कलाकरांचा समोवेश आहे.


- Advertisement -

हे वाचा-सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची कार्यक्रमाचा Grand Premiere लवकरच!

- Advertisement -