Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनChoreographer Ganesh Acharya : कोरियोग्राफर ते अभिनेता, नव्या सिनेमात गणेश आचार्य साकारणार अनोखी भूमिका

Choreographer Ganesh Acharya : कोरियोग्राफर ते अभिनेता, नव्या सिनेमात गणेश आचार्य साकारणार अनोखी भूमिका

Subscribe

सिनेसृष्टीत सध्या कॉमेडी चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अशातच आता आणखी एक बॉलिवूड चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे. ‘पिंटू की पप्पी’ असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट बॉलिवूड विश्वात धुमाकूळ घालायला सज्ज होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि अगदी उत्तम असा प्रतिसादही या चित्रपटाला मिळालेला पाहायला मिळाला. ट्रेलरबरोबरच या चित्रपटातील गाण्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. या सिनेमाच्या माध्यमातून प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. (Choreographer Ganesh Acharya playing important role in new film pintu ki pappi)

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड सिनेविश्वात कोरियोग्राफर म्हणून कार्यरत असणाऱ्या गणेश आचार्य यांनी अनेक सेलिब्रिटींना आपल्या इशाऱ्यावर नाचवलं आहे. दरम्यान, आगामी काळात ‘पिंटू की पप्पी’ या सिनेमाच्या माध्यमातून ते लवकरच अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा या वर्षातील बहुप्रतिक्षित रोमँटिक कॉमेडी सिनेमा असून अलीकडेच याचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. ‘V2S प्रॉडक्शन आणि एंटरटेनमेंट’च्या या सिनेमाची निर्मिती विधी आचार्यने आहे. तर सिनेमाचे कथा लेखक, दिग्दर्शक म्हणून शिव हरे यांनी बाजू सांभाळली आहे.

या आगामी कॉमेडी सिनेमात गणेश आचार्य यांच्यासोबत विजय राज, मुरली शर्मा, सुनील पाल, अली असगर, पूजा बॅनर्जी, अदिती संवाल, रिया एस सोनी, उर्वशी चौहान, प्यूमोरी मेहता दास, मुक्तेश्वर ओझा असे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. शिव हरे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा सिनेमा सिनेसृष्टीत एक हास्याची उमेद घेऊन येणार आहे. 21 मार्च 2025 रोजी ‘पिंटू की पप्पी’ हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही पहा –

IIFA 2025 Winners List : कार्तिक आर्यन, राघव जुयाल आणि कुणाल खेमूसह या कलाकारांनी जिंकले IIFA अवॉर्ड