घरताज्या घडामोडीगणेश आचार्यची Oo Antava वर हुक स्टेप पाहून अल्लू अर्जुन अन् समांथाचा...

गणेश आचार्यची Oo Antava वर हुक स्टेप पाहून अल्लू अर्जुन अन् समांथाचा तूफान लाफ्टर

Subscribe

माझ्या आवडीच्या लोकांसोबत आणखी हिट गाणं, सेटवर या दोघांसोबत फार मजेदार वेळ घालवण्याची संधी मिळालीय. गणेशने शेअर केलेल्या व्हिडीओला आतापर्यंत 80 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

अल्लू अर्जुनचा पुष्पा: द राइज हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तूफान गाजतोय. केवळ साउथ भाषेतीलच नाही तर हिंदी भाषेतील सिनेमालाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. सिनेमाप्रती प्रेक्षकांच्या चांगल्या कमेंट सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. सिनेमातील समांथाचं ओ अंटावा हे आयटम साँग प्रेक्षकांनी भलतेच डोक्यावर घेतले आहे. समांथाचा बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षक फिदा झालेत. गाण्यातील अल्लू अर्जुन आणि समांथाची हूक स्टेप तरी प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या गाण्याचा एक BTS व्हिडीओ शेअर करण्यात आली आहे. ज्यात कलाकार ओ अंटावाची हुक स्टेप करताना दिसत आहेत.

ओ अंटावा गाण्याच्या बिहाइंड द सीन फार मज्जा मस्तीने भरलेला आहे. गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्यने केली आहे. गणेश आचार्यने अल्लू अर्जुन आणि समांथाला चांगलेच नाचवल आहे. गणेश आचार्यने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलायत ज्यात तो ओ अंटावाची हुक स्टेप अल्लू आणि समांथाला शिकवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ganesh Acharya (@ganeshacharyaa)

- Advertisement -

अल्लू अर्जुनने गाण्यात जी स्टेप केली आहे ती स्टेप गणेश आचार्य आणि त्याची असिस्टंट करताना दिसत आहे. गणेश दोघांना स्टेप्स शिकवत असतो तेव्हा अल्लू आणि समांथा एकमेकांकडे पाहत असतात. गणेश नाचायचा थांबताच अल्लू आणि समांथा मोठ मोठ्याने हसताना दिसतात. गणेश आचार्यने व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, माझ्या आवडीच्या लोकांसोबत आणखी हिट गाणं, सेटवर या दोघांसोबत फार मजेदार वेळ घालवण्याची संधी मिळालीय. गणेशने शेअर केलेल्या व्हिडीओला आतापर्यंत 80 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

- Advertisement -

पुष्पा द राइज हा सिनेमा 17 डिसेंबरला 2021 ला प्रदर्शित झाला. सिनेमाच्या हिंदी वर्जनने आतापर्यंत 88करोड रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा आकडा 90 करोडपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. पुष्पा हा सिनेमा पाच भाषांसह अमेझॉनवर देखील रिलीज करण्यात आला आहे.


हेही वाचा – अमूलकडून Pushpa चं क्यूट कौतुक; अल्लू अर्जुन म्हणे, Allu to Mallu to Amallulru Arjun

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -