घरमनोरंजनअक्षय कुमारच्या हस्ते ‘चुंबक’च्या ट्रेलरचे अनावरण

अक्षय कुमारच्या हस्ते ‘चुंबक’च्या ट्रेलरचे अनावरण

Subscribe

बॉलिवूडचा आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमारच्या हस्ते ‘चुंबक’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण पार पडले. यावेळी चित्रपटाती संपूर्ण कलाकार व तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होते.

बॉलिवूडचा आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमारच्या हस्ते ‘चुंबक’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण पार पडले. यावेळी चित्रपटाती संपूर्ण कलाकार व तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होते. यावेळी अक्षय कुमार म्हणाला की, मी खूप विचार करून चित्रपट निवडतो. चित्रपटाची कथा ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चुंबकची कथा मी वाचली आणि नंतरच मी यासाठी होकार दिला. चित्रपट खूप सुंदर झाला आहे. तुम्हाला आताच्या मुंबईच दर्शन होईल.

या चित्रपटात प्रसन्नाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या स्वानंद किरकिरे म्हणाले  की, ‘मला सुरुवातीला असे वाटले की या चित्रपटाच्या संगीतासाठी चित्रपटाची टीम मला भेटते आहे. पण माझ्याकडून त्यांना अभिनय करून घ्यायचा आहे आणि त्यातही ही मुख्य भूमिका आहे, असे जेव्हा मला कळले तेव्हा मला धक्काच बसला. चित्रपट मी करण्याचे ठरवले त्याचे एकमेव कारण म्हणजे ही व्यक्तिरेखा. ही व्यक्तिरेखा साकारणे हे एक मोठे आव्हान तर होतेच पण आयुष्यातील ती एक महत्वाची भेटही होती. या व्यक्तिरेखेने आयुष्यातील काही महत्वाचे धडेही दिले आणि आयुष्य कायमस्वरूपी बदलूनही  टाकले. पहिल्यांदा मी अभिनेता म्हणून सगळ्यांसमोर येत आहे. माला खात्री आहे प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल!’
बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने चुंबक चित्रपटाची प्रस्तुती केली असून निर्मिती अरुणा भाटीया, नरेन कुमार आणि ‘केप ऑफ गुड फिल्म्स’नी केली आहे. तर दिग्दर्शन संदीप मोदी यांनी केले आहे. चित्रपट २७ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

- Advertisement -

‘३१ दिवस’’चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न

फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी. एस. बाबू निर्मित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित ‘३१ दिवस’ चित्रपट येत्या २० जुलैला प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत अनावरणाचा सोहळा पार पडला. यावेळी कलाकार व इतर मंडळी उपस्थित होते. या चित्रपटाला संगीत चिनार-महेश यांनी दिलेय. याबाबत चिनार – महेश म्हणतात, चित्रपटाची गाणी सुंदर होण्याचे विशेष कारण म्हणजे दिग्दर्शक आशिष भेलकर यांनी दिलेले चित्रपटाच्या कथेचे नेमके नॅरेशन आणि गाणी करण्याचे स्वातंत्र्य. ही गाणी सहज प्रेक्षकांच्या मनाला भिडतील. या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत त्यातील तीन गाणी प्रेक्षकांसमोर लवकरच येतील आणि एक गाणे चित्रपटाचा टर्निंग पॉईंट असल्याने मोठ्या पडद्यावरच पाहणे योग्य राहील.

‘३१ दिवस’ या चित्रपटाची कथा मकरंद आणि त्याच्या कला क्षेत्राशी निगडित असलेल्या स्वप्नाविषयी आहे. या चित्रपटाची कथा उमेश जंगम, छायांकन अनिकेत खंडागळे, संकलन देवेंद्र मुरुडेश्वर, नृत्य दिग्दर्शक वृषाली चव्हाण, स्टंट डिरेक्शन रोहित शेट्टी फेम सुनील रॉड्रिक्स यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता शशांक केतकर, मयुरी देशमुख, रिना अगरवाल प्रमुख भूमिकेत असून विवेक लागू, सुहिता थत्ते, आशा शेलार, अरुण भडसावळे आणि नितीन जाधव यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -