गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा शोध घेणारा अत्यंत लोकप्रिय झालेला CID हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर 21 डिसेंबर 2024 पासून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. दर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल. शिवाजी साटम (ACP प्रद्युमन), दयानंद शेट्टी (दया) आणि आदित्य श्रीवास्तव (अभिजीत) हे कलाकार पुन्हा एकदा त्याच्या गाजलेल्या भूमिकेत दिसणार आहेत. एका दिलखुलास मुलाखतीत या शोच्या पुनरागमनाबद्दल दयानंद शेट्टी बोलत होते.
खरं सांगायचं तर, आम्ही जेव्हा पहिल्यांदा CID सुरू केली, तेव्हा आमच्यातल्या कोणालाच ही कल्पना नव्हती ही मालिका इतकी लोकप्रिय होईल आणि एकामागून एक दशके लोक या मालिकेवर प्रेम करतील. CID ने हा दर्जा मिळवला, त्याच्या मागे समस्त टीमचे परिश्रम आहेत- आमचे लेखक, दिग्दर्शक, सह-कलाकार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या चाहत्यांनी दिलेले प्रेम. या गोष्टीचा मला अचंबा वाटतो की वेगवेगळ्या वयोगटातील, पिढ्यांमधील लोक अजूनही या मालिकेशी निगडीत आहेत. इतक्या लोकांसाठी ही मालिका इतकी जवळची झाली आहे हे पाहून मी भारावून जातो. अशा लोकप्रिय मालिकेत सहभागी असल्याची जाणीव मला नेहमीच आनंद देत राहील.
इतकी वर्षे आमच्याशी निष्ठावान राहिलेल्या आमच्या सगळ्या चाहत्यांविषयी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. तुमचे प्रेम आणि निष्ठा हाच या मालिकेचा प्रेरणास्रोत आहे. मला माहीत आहे की, तुम्ही या मालिकेच्या नव्या सीझनची उत्सुकतेने वाट बघत आहात. मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही केलेल्या प्रतीक्षेचे फळ तुम्हाला मिळेल. तुमचा उत्साह, तुमचे मेसेजिस आणि तुमचे समर्थन यामुळे इतकी वर्षे ही मालिका चालली आणि त्यानंतरही जिवंत राहिली. नवा सीझन देखील तसाच रोमांचक आणि मनोरंजक व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे आणि आम्हाला आशा आहे की, हा सीझन देखील तुमच्या जीवनात आनंद, रहस्य आणि न्याय भावना घेऊन येईल. CID तुमच्यामुळेच परत येत आहे, असे दयानंद शेट्टी म्हणाला .
Edited By – Chaiatli Shinde