घरताज्या घडामोडीGood News : लवकरच उघडणार चिमुरड्यांसाठी सिनेमांचे प्रत्यक्ष पडदे

Good News : लवकरच उघडणार चिमुरड्यांसाठी सिनेमांचे प्रत्यक्ष पडदे

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या २८ फेब्रुवारीपासून चिल्लर पार्टीसाठी प्रत्यक्ष सिनेमे दाखवण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या नऊ महिन्यांपासून बंद करण्यात आलेली चित्रपटगृहे नुकतीच सुरु करण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ आता येत्या २८ फेब्रुवारीपासून चिल्लर पार्टीसाठी प्रत्यक्ष सिनेमाचे पडदेही उघडणार आहे. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी छोट्या मुलांसाठी चित्रपट दाखवण्यात येतात. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात चिमुरड्यांना तब्बल ४८ बालचित्रपट दाखवण्यात आले होते. मात्र, आता चिमुरड्यांना प्रत्यक्ष सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे चिमुरड्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ऑनलाइन पद्धतीने दाखवण्यात आले चित्रपट

लॉकडाऊनच्या काळातही चिमुरड्यांना ऑनलाईन पद्धतीने चित्रपट दाखवण्यात आले होते. यासाठी चिमुरड्यांच्या पालकांचा whatsapp नंबर घेऊन एक ग्रुप तयार करण्यात आला होता. या ग्रुपवर बालचित्रपटाची लिंक टाकली जायची. मात्र, लॉकडाऊनच्या काळात कधीही खंड पडू दिला नाही. दर रविवारी बालचित्रपटांच्या लिंक पाठवल्या जायच्या. त्यामुळे मुलांसह पालकांना देखील तब्बल ४८ बालचित्रपट पाहण्याची संधी मिळाली.

- Advertisement -

शाहू स्मारक भवन येथे दाखविण्यात येणार सिनेमे

चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी छोट्या मुलांसाठी विनामूल्य सिनेमे दाखविण्यात येतात. हे चित्रपट सध्या ऑनलाईन दाखवले जात आहेत. मात्र, येत्या २८ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष सिनेमे दाखवले जाणार आहेत. तसेच या उपक्रमात मोठ्या संख्येने छोट्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे मिलिंद यादव यांनी केले आहे.


हेही वाचा – रिक्षा चालकाची मुलगी मान्या सिंह ठरली ‘Miss India 2020’ रनर अप

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -