घरताज्या घडामोडीSalman Khanला एअरपोर्टवर चेकिंगसाठी थांबवलेल्या CISFच्या जवानाला शिक्षा नाही तर बक्षीस

Salman Khanला एअरपोर्टवर चेकिंगसाठी थांबवलेल्या CISFच्या जवानाला शिक्षा नाही तर बक्षीस

Subscribe

सलमान खानला चेकींगसाठी अडवून त्याला कसून चौकशी केल्याने CISFच्या जवानाला शिक्षा होईल असे सर्वांनी म्हटले होते. मात्र त्याच्या कर्तव्यदक्ष कामगिरीचे सर्वांनी कौतुक करत त्याला बक्षीस देखील दिले.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या टायगर ३ (Tiger 3) या सिनेमाच्या शुटींगसाठी रशियाला रवाना झाला आहे. रशियाला जाण्याआधी सलमान सोबत मुंबई विमानतळावर घडलेला किस्सा सर्वांच्या लक्षात असेल. सलमानच्या सिक्युरिटीला न जुमानता आपल्या कर्तव्याचे पालन करणाऱ्या एका CISF च्या जवानाने सलमानला सर्वसामान्य लोकांची वागणूक देत चेकींगसाठी अडवले आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर CISFच्या जवानाचे सर्वांनी मोठे कौतुक केले.  त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन CISFच्या अधिकाऱ्याला सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी बक्षीस देखील देण्यात आले आहे. CISFच्या जवानाने याविषयीचे एक ट्विट केले त्यातून ही माहिती समोर येत आहे. सोमनाथ मोहंती असे CISF च्या जवानाचे नाव आहे. सलमान खानला चेकींगसाठी अडवून त्याला कसून चौकशी केल्याने CISFच्या जवानाला शिक्षा होईल असे सर्वांनी म्हटले होते. मात्र त्याच्या कर्तव्यदक्ष कामगिरीचे सर्वांनी कौतुक करत त्याला बक्षीस देखील दिले. (CISF trooper rewarded for best performance after stopping Salman Khan for checking at airport)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

सलमान खान आणि त्याची संपूर्ण टीम टायगर ३ या सिनेमाच्या शुटींगसाठी रशियाला रवाना होण्यासाठी मुंबई विमानतळावर दाखल झाली होती. त्यावेळी सलमान खानला विमानतळाच्या एंट्रीवरच थांबवण्यात आले. ‘सलमान खान माझ्यासाठी कोणताही सेलिब्रेटी नाही. मला त्याची चेकींग करावी लागेल. मी माझे काम करत आहे’, असे CISF जवानाने स्पष्ट केले. त्याच्या या भूमिकेनंतर सलमानच्या चाहत्यांनी आवाज केला. मात्र सलमानने स्वत: ‘त्याला त्याचे काम करु द्या’, असे सांगितले.

- Advertisement -

टायगर ३ या सिनेमाची शुटींग सध्या रशियाला सुरू आहे. पुढील २ महिने रशियाला हे शुटींग सुरू राहणार आहे. सलमान सोबत सिनेमात कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमातील सलमानचा एक आगळा वेगळा लुक देखील सोशल मीडियावर लीक झाला आहे. सलमानच्या नव्या लुकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.


हेही वाचा – Tiger 3 मधील सलमानचा लूक झाला लीक, भाईजानला ओळखणे झाले कठीण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -