कॉफी विथ करण कार्यक्रमात नुकतेच अभिनेता अजय देवगण आणि काजोल आली होती. शो दरम्यान दिग्दर्शक करण जोहर याने अजय आणि काजोलला मसकरीत अनेक प्रश्न विचारले. करणने आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिलेल्या भांडणावरही प्रश्न केले. तसेच करण काजोलला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याला कसे वाटले याचीही वाच्यता करण्यात आली. काजोल-अजयच्या भांडणांबद्दल तर सर्वांना माहिती आहे. अनेकदा अजय प्रॅन्कद्वारे काजोलची मसकरी करतो. यामसकरीमध्ये अनेकदा काजोल त्याच्यापासून रागावते. अशीच एक घटना शोदरम्यान घडली.
View this post on Instagram
@ajaydevgn talk about @kajol shopping habit ? my gurl #kajol #ajaydevgan #karanjohar
कोणती आहे ती घटना
अभिनेता अजय देवगन आपल्या पत्नीला कोणत्याची कार्यक्रमाला घेऊन जात नसल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र कार्यक्रमाला उपस्थिती लावण्या ऐवजी काम करणे मला आवडेल असे अजय देवगन म्हणाला. जेव्हा करणने अजयला विचारले की,”या पिढीतील कोणता अभिनेता जोडी म्हणून काजोलला शोभेल?” या प्रश्नावर अजयने तत्काळ उत्तर दिले, “मुलाच्या भुमिकेत हवा आहे का.” या वर काजोल अजयवर रागावली. आणि आपल्या आपल्या चपलेकडे इशारा करत तिने प्रतिक्रीया दिली. “कुत्ते कमीने!जुते से…”अशी प्रतिक्रिया देत ती गप्प बसली. याच नंतर करणे विचारले की “प्रत्येक बॉलिवूड कलाकार आपल्या पत्नीला काय खोट बोलतो.” तर अजय म्हणाला,”अभिनेता पत्नीला एकच खोट बोलतो की मी तिच्यावरच प्रेम करतो.” त्याच्या या उत्तराने काजोल रागावून म्हणाली “घरी यायचंय ना.”
View this post on Instagram
24th of February 1999 ?? Omg how much I loved this episode ! @kajol expression too!
काजोल आणि अजय यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रश्न विचारले गेले. अजय आणि काजोलने तितक्याच गमतीदार पद्धतीने त्यांची उत्तर दिली.