‘कॉफी विथ करण’ शो एवढा हिट का होतो? करण जोहरने सांगितले कारण

या शोवर बऱ्याचदा टिका सुद्धा झाली आहे. एवढं असूनही 'कॉफी विथ करण' हा शो प्रसिद्धीच्या झोतात असतो. या सगळ्या संदर्भातच करण जोहर याने खुलासा केला आहे.

बॉलिवूड मधील प्रसिद्ध निर्मात्यांमध्ये आणि दिग्दर्शकांमध्ये करण जोहरचं(karan johar) नाव अवर्जून घेतलं जातं. करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ (coffe with karan) हा शो प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. याच शो च्या आगामी सिझन मुळे करण जोहर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रिटी या शो मध्ये हजेरी लावतात. करण जोहर या शोमध्ये सेलिब्रिटींसोबत गप्पा सुद्धा मारतो. सेलिब्रिटींच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट या शो मध्ये रिव्हिल होताना सुद्धा दिसतात. या शोची लोकप्रियता सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. पण अनेकदा हा शो वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडला आहे. या शोवर बऱ्याचदा टिका सुद्धा झाली आहे. एवढं असूनही ‘कॉफी विथ करण’ हा शो प्रसिद्धीच्या झोतात असतो. या सगळ्या संदर्भातच करण जोहर याने खुलासा केला आहे.

हे ही वाचा –  ‘धनंजय माने इथेच राहतात का’ : मीम्स बनविणाऱ्याने घेतली अशोक सराफांची भेट

‘कॉफी विथ करण'(coffe with karan) हा शो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पहिले आहे. पण तरीही हा प्रसिद्धीच्या झोतात कायम आहे. त्याच बरोबर या शो मध्ये आलेले सेलिब्रिटी आणि त्यांनी केलेली काही वक्तव्यं यामुळे सेलिब्रिटी सुद्धा सोशल मीडियावर वादाचा मुद्दा ठरले आहेत. ‘कॉफी विथ करण’ या शो वरूनही अनेक वाद झाले. सोशल मीडियावरसुद्धा ‘कॉफी विथ करण'(coffe with karan) या शो संदर्भात बरंच बोललं गेलं. या सगळ्या संदर्भातच करण जोहर याने खुलासा करत सांगितले. की ‘मला माहित होतं की हे सगळं सोशल मीडियापर्यंतच मर्यादित आहे. याच बिझनेसशी काहीच संबंध नाही. हे सर्व सत्य नाही., कारण जर का हे सगळं सत्य असतं तर हा शो सुरूच झाला नसता, आणि त्या सोबतच कोणताही सेलिब्रिटी या शो मध्ये यायला तयार झाला नसता.’ याच संदर्भात बोलताना करण जोहर पुढे म्हणाला, की जर शोवर केली जाणारी टीका खरी असती तर मी स्वतःहून हा शो करण्यामध्ये अजिबात रस दाखवला नसता. ही टीका, नकारात्मकता हा केवळ भ्रम आहे हे मला नेहमीच जाणवतं. हे सर्व वास्तवात कुठेच नसतं. ज्या बॉलीवूडला तुम्ही गेली १०० वर्षे प्रेम देत आहात, त्या बॉलिवूडचा तुम्ही अचानक कसा काय करू शकता. माझ्या शोवर जी टीका केली जाते त्याची मला अजिबात चिंता नाही. कारण मला माहित आहे हे सगळं कधीतरी संपणार आहे.” असं वक्तव्यं करण जोहरने केले आहे.

हे ही वाचा –  ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आलिया भट्टने हनीमूनबद्दल केला खुलासा, व्हिडीओ व्हायरल

हे ही वाचा – बिग बॉसच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; सलमान खानच्या ‘बिग बॉस 16’ वर स्थगिती

दरम्यान ‘कॉफी विथ करण'(coffe with karan) या शो चा सातवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो डिजनी प्लस हॉटस्टारवर(disney plus hotstar) प्रसारित केला जाणार आहे. ‘कॉफी विथ करण’ हा शो जरी वादाच्या भोवऱ्यात अडकला तरीही प्रेक्षकांनी या शो कडे पाठ फिरवली नाही. दिवसेंदिवस या शो ची लोकप्रियता वाढत आहे. ‘कॉफी विथ करण’ च्या आगामी सिझन पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा उत्सूक आहेत.

हे ही वाचा –  ‘सिनेसृष्टीत घराणेशाही ही नेहमीच असणार, पण…’, अभिनेता राजकुमार रावचं स्पष्ट मत