घरताज्या घडामोडीतीन महिन्यांनंतर श्रावणाच्या मुहुर्तावर होणार कलाकारांची भेट!

तीन महिन्यांनंतर श्रावणाच्या मुहुर्तावर होणार कलाकारांची भेट!

Subscribe

लॉकडाऊनमुळे गेले ३ महिने बंद असलेलं मालिकांच शुटींग आता पुन्हा सुरू झालं आहे. हळूहळू सगळकाही पूर्ववत होताना दिसू लागले आहे. कलर्स मराठी वाहिनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच मनोरंजन करायला सज्ज झाली येत्या २१ जुलैपासून मालिकांतील आपले आवडते कलाकार आपल्याला भेटायला येणार आहेत.

- Advertisement -

आपल्यातील दुरावा मिटवून मैत्री, प्रेम, विश्वास, भक्ति यां रंगाची पुन्हाएकदा नव्याने उधळण होणार आहे… अवघा महाराष्ट्र ज्यांच्या जयघोषाने दुमदुमला असे ‘संत बाळूमामा’, स्वामिनी मालिकेमधील पेशवाईचा काळ आणि त्याचं देखणं रूप… रमाचा निरागस स्वभाव तर दुसरीकडे अत्यंत कठोर, धोरणी गोपिकाबाई, सिध्दी – शिवाच्या नात्यातील गोडवा, संजु – रणजीतमध्ये फुलणारे प्रेम, अनु – सिध्दार्थचं निस्वार्थी नात हे सगळ पुन्हा एकदा नव्या रंगात आपल्या भेटीला येत आहे एक रंजक वळण घेऊन.

View this post on Instagram

भक्तिभावाच्या आणि विश्वासाच्या आपल्या नात्यातून ऊर्जा घेऊन नव्या उमेदीने तुम्हाला भेटण्याच्या जोरदार तयारीला लागलाय आपला @sumeet_pusavale. घेऊन येतोय तुमच्या आवडत्या मालिकांचे नवे भाग. श्रावणाच्या नव्या रंगात रंगून जाऊया, नव्या विश्वासाने पुन्हा सुरूवात करूया. 21 जुलैपासून संध्या. 7 वा. आपल्या #ColorsMarathi वर.

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

- Advertisement -

या सर्व मालिकांचे शूट सुरू झाले असून सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात आले आहे.


हे ही वाचा – डॉ. डॉन मालिकेचा पूर्ण सेट कोरोना युध्दांच्या मदतीला!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -