Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कॉमेडियन कपिल शर्मा ने जाहिर केले मुलाचे नाव

कॉमेडियन कपिल शर्मा ने जाहिर केले मुलाचे नाव

काही दिवसांपुर्वी कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. कपिलने आत्तापर्यंत तरी सोशल मिडियावर मुलाचे फोटोज किंवा नाव जाहीर केले

Related Story

- Advertisement -

बॅालिवूड कलाकार नेहमी काही हटके प्रयोग करुन स्वत: ला चर्चेच्या भोवऱ्यात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचे प्रोफेशनल आयुष्य असो किंवा खाजगी आयुष्य त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीची चर्चा रंगतांना दिसते.अभिनेता कपिल शर्मा सध्या अशाच काही खास कारणांमुळे सोशल मिडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. कपिलने आत्तापर्यंत तरी सोशल मिडियावर मुलाचे फोटोज किंवा नाव जाहीर केले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

- Advertisement -

कपिलचा काल (४ एप्रिल २१) वाढदिवस होता. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा कपिलला त्याच्या चाहत्यांकडून तसेच सेलिब्रिटींकडून सोशल मिडियावर येत होत्या. सुप्रसिद्ध गायिका नीती मोहन हिने सुद्धा कपिलला ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि तसेच नीतीने कपिलला त्याच्या मुलाचे नाव देखील विचारले. नितीच्या ट्विटला उत्तर देतांना कपिल म्हणाला ‘धन्यवाद नीती, आशा आहे की,तू स्वतःची काळजी घेत आहे. आम्ही मुलाचे नाव ‘त्रिशान’ असे ठेवले आहे.’ तसेच कपिल ने भगवान कृष्णाच्या नावावरून त्याच्या मुलाचे नाव ठेवण्यात आल्याचे समजते.

- Advertisement -

कपिलच्या या ट्विटवर अनेकांनी त्याला मुलाचा फोटो पोस्ट करण्यासाठी विनंती केली. तसेच त्रिशान हे खुप छान नाव आहे असे देखिल म्हणाले. कपिलला याआधीही एक मुलगी आहे. वर्क्रफंट बाबत सांगायचे झाल्यास कपिल शर्माचा शो काहि दिवसांपुर्वी ऑफ एअर झाला होता.पण आता पुन्हा शो सुरु होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.


हे हि वाचा –‘चालबाज इन लंडन’ मध्ये श्रद्धाचा डबल रोल

- Advertisement -