घरताज्या घडामोडीकॉमेडियन मुनव्वर फारुकी होणार Lock Upp, कंगना करणार टॉर्चर

कॉमेडियन मुनव्वर फारुकी होणार Lock Upp, कंगना करणार टॉर्चर

Subscribe

मुनव्वर फारुकी हा प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आहे. काही वर्षांपूर्वी त्याला इंदौर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याने अटक केली होती. जवळपास एक महिना मुनव्वर जेलमध्ये होता.

Lock Upp : कंगाच्या लॉक अप या निर्भीड रिअँलिटी शोची उत्सुकता संपली असून शोमधील कलाकारांची नावे समोर आली आहे. लॉक अपमध्ये सहभागी होणारी निशा रावल या पहिल्या स्पर्धकाची घोषणा केल्यानंतर आता दुसऱ्या स्पर्धकाची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या स्पर्धकाच्या नावावरुन अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या. मात्र आता त्या सगळ्या अफवांना पूर्णविराम देत निर्मात्यांनी एक व्हिडीओ शेअर करत दुसऱ्या स्पर्धकाचे नाव घोषित आहे. कॉमेडियन मनुव्वर फारुकी हा कंगनाच्या लॉकअपमध्ये जाणारा दुसरा स्पर्धक असणार आहे.

मुनव्वर फारुकी हा प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आहे. काही वर्षांपूर्वी त्याला इंदौर पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याने अटक केली होती. जवळपास एक महिना मुनव्वर जेलमध्ये होता. मुनव्वर स्टँड अप कॉमेडियन सोबतच लेखक आणि रॅपर आहे. लॉक अपमध्ये स्पर्धक म्हणून निवड झाल्यानंतर मुनव्वर म्हणाला, लॉक अप हा अनोखा शो असणार आहे. भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मचा चेहरा बदलण्याची या शोमध्ये ताकद आहे. माझा इथला प्रवास जरी आव्हानात्मक असला तरी मी या सेट आहे याचा मला आनंद आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

- Advertisement -

निर्माती एकता कपूरने भारतीय प्रेक्षकांसाठी हा नवा रिअँलटी शो सुरू केला आहे. २७ फेब्रुवारीपासून हा शो एमएक्स प्लेअरवर फ्री स्ट्रिम करण्यात येणार आहे. कंगना हा शो होस्ट करणार असून यात १६ कॉन्ट्रोलर्शियल सेलिब्रेटी कोणत्याही सुविधेविना काही महिने जेलमध्ये बंद राहणार आहेत. सहभागी होणाऱ्या १६ स्पर्धकांना कंगनाशी पंगा असणार आहे. कंगना त्यांची शाळा घेत त्यांना टॉर्चर करताना दिसणार आहे. त्याचप्रमाणे कंगनाच्या चाहत्यांना पहिल्यांदाच तिला एका अँकरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –   ‘पुष्पा’ची श्रीवल्ली विजय देवरकोंडाशी बांधणार लग्नगाठ?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -