HomeमनोरंजनComedian Pranit More : कॉमेडियन प्रणित मोरेला जबर मारहाण, अभिनेत्यावर केलेला विनोद...

Comedian Pranit More : कॉमेडियन प्रणित मोरेला जबर मारहाण, अभिनेत्यावर केलेला विनोद अंगलट

Subscribe

सोशल मीडिया, युट्युबवर सक्रिय असणाऱ्या आणि तरुण वर्गातील लोकांना प्रणित मोरे हे नाव काही अनोळखी नव्हे. आपल्या अनोख्या शैलीतून विनोदाचं अचूक टायमिंग पकडत प्रणितने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आज स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. यूट्यूबवर त्याच्या व्हिडीओंना लाखोंच्या घरात व्ह्यूज असतात. अशा या लोकप्रिय विनोदवीराला त्याच्या विनोदबुद्धीमूळे मारहाण झाल्याचे समोर आले आहे. (Comedian Pranit More Assaulted For Joke On Veer Pahariya)

अभिनेता वीर पहाडियावर केलेल्या विनोदामुळे प्रणित मोरेला सोलापूरमध्ये 10- 11 लोकांच्या गटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वीर हा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. प्रणितवरील हल्ल्यासंदर्भात त्याने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

प्रणित मोरेची Insta पोस्ट

‘स्काय फोर्स’ फेम अभिनेता वीर पहाडियावर केलेल्या विनोदामुळे आपल्याला मारहाण झाल्याचे स्टँडअप कॉमेडीयन प्रणित मोरे याने म्हटलंय. यासंदर्भात त्याच्या टीमने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात म्हटलंय, ‘विनोदासाठी मारहाण केली.. आम्हाला नुकत्याच घडलेल्या एका भयानक घटनेवर प्रकाश टाकायचा आहे. 2 फेब्रुवारी 2025 रोजी, संध्याकाळी 5:45 वाजता, 24K क्राफ्ट ब्रूझ येथे प्रणितच्या सोलापूरमधील स्टँडअप शोनंतर, तो नेहमीप्रमाणे चाहत्यांना भेटण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी मागे थांबला. गर्दी ओसरल्यावर 11-12 जणांचा एक गट त्याच्याजवळ चाहत्यांच्या वेशात आला. पण ते फोटोंसाठी नव्हे तर त्याच्यावर शारीरिक हल्ला करण्यासाठी आणि धमकावण्यासाठी आले होते’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pranit More (@rj_pranit)

पुढे लिहलंय, ‘त्यांनी प्रणितवर क्रूरपणे हल्ला केला. त्याला वारंवार लाथा मारल्या, त्यामुळे तो जखमी झाला. या हल्ल्याचा म्होरक्या तनवीर शेख होता आणि त्याच्या टोळीने हे स्पष्ट केले की ते असे का करत आहेत. त्यांनी प्रणितला बॉलीवूडमधील नवोदित अभिनेता वीर पहाडियाबाबत केलेल्या विनोदवरून मारहाण केल्याचे म्हटले. त्यांच्यापैकी एकाने “अगली बार वीर पहाडिया बाबा पे जोक मारके दिखा” अशी धमकीही दिली. त्याच्याबद्दल पुन्हा चेष्टा करण्याचे धाडस केलेस तर वाईट परिणाम भोगावे लागतील असा स्पष्ट इशारा दिला’.

‘आणखी धक्कादायक बाब म्हणजे 24K Kraft Brewzz या ठिकाणी कोणतीही सुरक्षा नव्हती. अनेक विनंत्या करूनही ते सीसीटीव्ही फुटेज देण्यास नाकारत आहेत, ज्यात महत्त्वपूर्ण पुरावे आहेत. यावेळी आम्ही पोलिसांशीही संपर्क साधला. पण मदत पाठवण्याचे आश्वासन देऊन त्यांनी काहीही मदत केली नाही. एखाद्या विनोदी कलाकारावर केवळ विनोद करण्यासाठी शारिरीक हल्ला केला जाऊ शकतो, तर आपल्या मूलभूत हक्कांबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल काय म्हणाल? महाराष्ट्रीयन कलाकार या नात्याने, त्यांच्या राज्यात त्यांना केवळ काम करण्यासाठी अशा हिंसाचाराला सामोरे जावे लागेल, याची आम्ही कल्पनाही केली नव्हती’.

‘लोकांना वस्तुस्थिती कळायला हवी म्हणून आम्ही हे शेअर करत आहोत. महाराष्ट्र हे त्यांचे घर आहे आणि आम्ही अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत, जिथे संवाद आणि विनोद यांची जागा हिंसाचार आणि दडपशाहीने घेतली आहे हे मानण्यास आम्ही अजूनही नकार देतो. हे निराशाजनक, त्रासदायक आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आम्ही मुंबईहून ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करतो. जय महाराष्ट्र – टीम प्रणित’

वीर पहाडियाने मागितली माफी

स्टँड- अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या या पोस्टनंतर अभिनेता वीर पहाडियाने त्याची आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. वीरने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

ज्यात त्याने म्हटलंय, ‘प्रणितसोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाली आणि मला धक्का बसला. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मी कोणत्याही हिंसेला समर्थन करत नाही आणि करणार नाही. तरी घडलेल्या प्रकारबद्दल मी प्रणित आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागतो. दोषींवर कारवाई होईल या बाबतीत मी स्वतः लक्ष घालेन’.

हेही पहा –

Bigg Boss Marathi : बाईईई हा काय प्रकार? Bigg Boss मराठी 5 पुन्हा टेलिकास्ट होणार