घरमनोरंजनकॉमेडीयन राजू श्रीवास्तव पुन्हा व्हेंटिलेटरवर

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव पुन्हा व्हेंटिलेटरवर

Subscribe

राजू श्रीवास्तव यांना अचानक खूप ताप येऊ लागला त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुन्हा व्हेंडिलेटरवर ठेवण्याचा निर्णय घेतला. आता त्यांची प्रकृती पुन्हा नाजूक असल्याचं म्हटलं जात आहे.

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा खालावली असून त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. राजू श्रीवास्तव यांना अचानक खूप ताप येऊ लागला त्यामुळे डॉक्टरांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राजू श्रीवास्तव आता शुद्धीवर आले आहेत. तसेच पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात आपल्या शरीराची हालचाल सुद्धा करत आहेत.

राजू श्रीवास्तव पुन्हा व्हेंटिलेटरवर
राजू श्रीवास्तव यांना अचानक खूप ताप येऊ लागला त्यामुळे डॉक्टरांनी हा निर्णय घेतला असून त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवले गेले आहे. आता त्यांची प्रकृती पुन्हा नाजूक असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

एका आठवड्यापूर्वी राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आली होती. याबाबत त्यांचा मित्र आणि अभिनेता सुनील पालने दिली होती.याआधी डॉक्टरांनी सांगितलं होतं की, राजू श्रीवास्तव यांच्या डोक्यातील तीन नासांमधील एक नस ब्लॅक झाली आहे. ज्याच्या उपचारासाठी न्यूरोफिजियोथेरेपीची मदत घेतली जात आहे. यासोबत राजूंची मानसिक स्थिती देखील ठिक करण्यासाठी अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकवला जात होता.

राजू श्रीवास्तव यांची तब्येत कधी आणि कशी बिघडली?
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचा घेत आहेत. सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे आणि प्रत्येक क्षणी त्यांचे निरीक्षण करत आहे.


हेही वाचा : राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा; मुलीने दिली माहिती

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -