घरमनोरंजनकॉमेडीयन अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन

कॉमेडीयन अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन

Subscribe

जगाला हसवणारी व्यक्ती आज आपल्यातून जग सोडून गेली आहे. राजू श्रीवास्तव हे जवळपास 40 दिवसांपासून रुग्णालयात होते. मात्र 41 दिवस उलटून गेले तरी त्यांना शुद्ध आलेली नव्हती. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करताना त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे आज त्यांचे निधन झाले.

मागील दीड महिन्यांपासून (42 दिवस) एम्स रूग्णालयात उपचार घेत असणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचे आज वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाला आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्ली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वारंवार त्यांच्या प्रकृतीच्या नवीन अपडेट समोर येत होत्या. मागील काही दिवसांपूर्वी राजू यांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावली असून आज दिल्लीतील एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदाचा ठसा उमटवणाऱ्या विनोदवीराच्या जाण्याने अनेक कलाकार शोक व्यक्त करत आहेत.

मागील अनेक दिवसांपासून होते व्हेंटिलेटरवर
राजू श्रीवास्तव यांना मागील अनेक दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांकडून आणि कुटुंबियांकडून ते लवकर ठीक होणार असल्याचं माहिती दिली जात होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, राजू श्रीवास्तव यांच्या डोक्यातील तीन नासांमधील एक नस ब्लॅक झाली आहे. ज्याच्या उपचारासाठी न्यूरोफिजियोथेरेपीची मदत घेतली जात होती.

- Advertisement -

राजू श्रीवास्तव यांची तब्येत कधी आणि कशी बिघडली?
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचा घेत आहेत. सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे आणि प्रत्येक क्षणी त्यांचे निरीक्षण करत आहे.

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज’ कार्यक्रमाने मिळाली ओळख
राजू श्रीवास्तव यांना कॉमेडीचा बादशाह म्हटलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज’ या कार्यक्रमाने राजू श्रीवास्तव यांना ओळख दिली.

- Advertisement -

हेही वाचा :

‘ज्विगाटो’मध्ये कपिल शर्मा मुख्य भूमिकेत; डिलिव्हरी बॉयची साकारणार भूमिका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -