घरताज्या घडामोडीसर्जरीनंतर कॉमेडियन सुनील ग्रोवरचं कमबॅक, आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात

सर्जरीनंतर कॉमेडियन सुनील ग्रोवरचं कमबॅक, आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात

Subscribe

सुनील ग्रोवरची हार्ट सर्जरी झाली तेव्हा त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. सर्जरीनंतर सुनीलने सोशल मीडियावर त्याच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या लाखो चाहत्यांचे आभार मानले होते.

डॉ. महशूर गुलाटी म्हणजेच सर्वांचा लाडका कॉमेडियन सुनील ग्रोवरवर काही महिन्यांपूर्वी हार्ट सर्जरी झाली. सर्जरीनंतर सुनील ग्रोवर पूर्णपणे आराम करत होता. सुनील ग्रोवरच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत होता.  सुनीलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्जरीनंतर उत्तम उपचार घेऊन सुनील ग्रोवर पूर्णपणे ठीक झाला असून त्याने सिनेसृष्टीत कमबॅक केले आहे. सुनीलने त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

सुनील ग्रोवरने प्रकृतीस्वास्थ्यामुळे ब्रेक घेतल्याने त्याला स्क्रीनवर पाहण्यासाठी त्याचे चाहते फार आतूर झाले होते. खरंतर त्याच्या चाहत्यांच्या आशिर्वादामुळेच तो पूर्णपणे बरा झाला असून नव्या उत्साहाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुनील ग्रोवर सर्जरीनंतर फिट एण्ड फाईन झाला आहे. त्याच्या नव्या खास प्रोजेक्टसाठी त्याने ऋषिकेश येथे शूटिंगही सुरू केलेय. कठोर परिश्रमानंतर सुनील पुन्हा कामावर परतला आहे.

- Advertisement -

दररोजच्या व्यस्त शेड्यूलमुळे सुनील आरोग्यविषयी समस्या निर्माण झाल्या. हार्ट सर्जरी केल्यानंतर सुनील त्याच्या डाएटवर फार लक्ष देतोय. शूटिंगच्या वेळी तो नियमित योगा आणि हेल्दी डाएट फॉलो करतोय. सेटवर सगळेच त्याचे या गोष्टीसाठी कौतुक करत आहेत.

सुनील ग्रोवरची हार्ट सर्जरी झाली तेव्हा त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. सर्जरीनंतर सुनीलने सोशल मीडियावर त्याच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या लाखो चाहत्यांचे आभार मानले होते.

- Advertisement -

सुनीलच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर “कॉमेडी नाइट्स विथ कपिल” आणि “द कपिल शर्मा शो” मध्ये सुनील डॉ. महशूर गुलाटी, गुत्थी आणि रिंकू देवी सारख्या भूमिका साकारल्या होत्या. सुनीलची प्रत्येक भूमिका टेलिव्हिजनवर हिट झाली. त्याचप्रमाणे सुनीलने “गब्बर”, “भारत” आणि “पटाखा” सारख्या सिनेमात आणि टेलिव्हिजनच्या अनेक जाहिरातीतही काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी “तांडव” या वेब सीरीजमध्येही सुनील ग्रोवर दिसला होता.


हेही वाचा –  IB 71 मध्ये अनुपम खेर साकारणार खास भूमिका, शूटींगला सुरुवात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -