घरताज्या घडामोडीSunil Grover Heart Surgery: कॉमेडियन सुनील ग्रोवरवर ह्रदयाची शस्त्रक्रिया

Sunil Grover Heart Surgery: कॉमेडियन सुनील ग्रोवरवर ह्रदयाची शस्त्रक्रिया

Subscribe

नील ग्रोवर यांनी 'हिरोपंती', 'बागी', 'जिल्हा गाजियाबाद', 'गजनी' यासारख्या सिनेमात देखील काम केले आहे. त्याचप्रमाणे 'सनफ्लॉवर' आणि 'तांडव' या वेब सिरीजमध्ये ते दिसले होते.

प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोवरच्या (Sunil Grover Heart Surgery)  चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सुनील ग्रोवरच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही माहिती अभिनेत्री सिमी ग्रेवाल (simi garewal)  हिने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. ट्विट करत सिमीने लिहिले आहे की, सुनील ग्रोवरच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली आहे हे ऐकून मी फार शॉक झाली आहे. जो माणूस इतरांना हसवून त्यांच्या मनाला आनंद देतो. त्या माणसासोबत असे झालेले ऐकून मला फार वाईट वाटले. सुनील ग्रोवर यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी मी प्रार्थना करेन. त्यांचे टॅलेंट फार अद्भूत आहे मी त्यांची फार मोठी चाहती आहे.

- Advertisement -

सुनील ग्रोवरच्या फॅन्स देखील शस्त्रक्रियेची बातमी ऐकून मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सुनील ग्रोवरच्या प्रकृतीसाठी अनेकांनी ट्विट करत प्रार्थना केली आहे.

सुनील ग्रोवर यांच्या करिअरमध्ये आजवर अनेक चढ उतार आले आहेत. ‘चला लल्ला हिरो बनने’ या कॉमेडी शोमधून त्यांनी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘गुंटूर गूं’ या प्रसिद्ध शोमध्ये देखील त्यांनी प्रेक्षकांनी खळखळवून हसवले. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये देखील सुनील ग्रोवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. कपिल शर्मा सोबत सुनील ग्रोवर यांची खास मैत्री आहे. सुनील ग्रोवर यांनी ‘हिरोपंती’, ‘बागी’, ‘जिल्हा गाजियाबाद’, ‘गजनी’ यासारख्या सिनेमात देखील काम केले आहे. त्याचप्रमाणे ‘सनफ्लॉवर’ आणि ‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये ते दिसले होते.

- Advertisement -

सुनील ग्रोवरने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. सलमान खानच्या ‘भारत’ या सिनेमात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. प्रेक्षकांना देखील त्यांची ही भूमिका पसंतीस उतरली होती.


हेही वाचा – Soyrik Movie: लागिरं झालं जी फेम आज्याची सोयरीक ‘या’ दिवशी येणार थिएटरमध्ये

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -