Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'कपिल शर्माच्या शो'मध्ये डॉ. मशहूर गुलाटीची होणार एन्ट्री

‘कपिल शर्माच्या शो’मध्ये डॉ. मशहूर गुलाटीची होणार एन्ट्री

कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हरमध्ये झालं पॅच अप

Related Story

- Advertisement -

कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ शो काही दिवसांपूर्वी बंद झाला आहे. त्यामुळे मेकर्स पुन्हा एकदा नवीन फॉरमॅट आणि नवी एनर्जी घेऊन हा शो सुरु करणार आहेत. यात प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे डॉ. मशहूर गुलाटी फेम सुनिल ग्रोव्हर या शो मध्ये पुन्हा येणार असल्याची चर्चा आहे. असं बोललं जात आहे की कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हरला एकत्र आणण्यात सलमान खान महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हरमध्ये वर्षभरापूर्वी भांडण झालं होतं. त्यामुळे सुनिल ग्रोव्हरने कपिल शर्मा शो सोडला होता. दरम्यान, आता सलमान खान सुनिल ग्रोव्हरला पुन्हा एकदा शो मध्ये आणण्यासाठी मध्यस्थी करत आहे. कोइमोई डॉट कॉमवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील वादावर सलमान खानने तोडगा काढला आहे. सलमानचा सुनील खूप जवळचा मानला जातो आणि सुनील ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये परत यावा अशी सलमान खानची इच्छा आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की सलमानला हे का हवं आहे. खरं तर, सलमान खान शोचा निर्माता आहे. त्यामुळे त्याला शोमध्ये सुनीलची एन्ट्री करु शकतो.

- Advertisement -

याशिवाय कपिल शर्माच्या मेकअप आर्टिस्टने नुकताच फेसबुकवर सुनील ग्रोव्हरसोबतचा आपला फोटो शेअर केला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर सुनील ग्रोव्हर लवकरच शोमध्ये परत येईल अशी चर्चा सुरू झाली होती. तथापि, शोचे मेकर्स सुनील ग्रोव्हरशीही चर्चा करत आहेत. परंतु सुनील ग्रोव्हर कडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सुनिल आणि कपिलला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

- Advertisement -