घरताज्या घडामोडीडॉक्टरांचा अवमान प्रकरण, कॉमेडियन सुनील पाल विरोधात गुन्हा दाखल

डॉक्टरांचा अवमान प्रकरण, कॉमेडियन सुनील पाल विरोधात गुन्हा दाखल

Subscribe

देशात कोरोना संकट आणखीन गडद होत आहे. या संकटाच्या सुरुवातीपासून अहोरात्र आरोग्य व्यवस्थेतील कर्मचारी काम करत आहेत. यामध्ये डॉक्टरपासून वॉर्डबॉयपर्यंत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पण यादरम्यान डॉक्टर्सना बदनाम करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. अशाच एका प्रकारमध्ये कॉमेडियन सुनील पालचे देखील नाव समोर आले आहे. डॉक्टरांचा अवमान करणारा व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे कॉमेडियन सुनील पाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडले? काय आहे त्या व्हिडिओमध्ये?

अंधेरी पोलीस ठाण्यात कॉमेडियन सुनील पाल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनील पाल याने डॉक्टरांविषयी एक व्हिडिओ व्हायरल केला. त्यामध्ये डॉक्टरांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य आणि टीका करण्यात आली आहे. रुग्णालयात बेड, औषध, प्लाझ्मा नाही आहे, असे सांगून त्यांचे मानसिक शोषण केले जात आहे. सायंकाळपर्यंत गरीब रुग्णांचा मृत्यू होईल याची काळजी घेतली जात आहे, असे गंभीर वक्तव्य व्हिडिओमध्ये करण्यात आले होते. त्यामुळे असोसिएशन ऑफ मेडीकल कन्सल्टंटने सुनील पाल विरोधात तक्रार दाखल केली. जनतेमध्ये डॉक्टरांविषयी रोष निर्माण करणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच याप्रकरणी सुनील पालला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा – पुन्हा एकदा ‘रावण’ अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची पसरली अफवा, लक्ष्मणाने दिले उत्तर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -