घरमनोरंजनकॉमेडियन सुनील पालचे वादग्रस्त वक्तव्य, AIIMS च्या डॉक्टरांनी केली अटकेची मागणी

कॉमेडियन सुनील पालचे वादग्रस्त वक्तव्य, AIIMS च्या डॉक्टरांनी केली अटकेची मागणी

Subscribe

कॉमेडीयन सुनील पालने केलेल असे वक्तव्य आम्हाला मंजूर नाही.

डॉक्टरांना चोर बोलल्याबद्दल कॉमेडियन सुनील पालला अटक करा अशी मागणी डॉक्टरांतर्फे करण्यात आली आहे. जगभरामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा शिरकाव वेगाने होत आहे. सध्या अशी भयानक परिस्थिती ओढवली आहे की कोरोना रुग्णांनसाठी रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत,अनेक राज्यात ऑक्सिजनच्या अपुर्‍या साठे अभावी अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. अशातच स्टँड अप कॉमेडियन सुनील पाल याने कोरोना व्हायरसच्या वॉर्ड मध्ये काम करणार्‍या डॉक्टरांन बद्दल खळबळजनक वक्तव्य केल आहे.  वक्तव्यानंतर सुनील पाल वर एम्स मधील रेसीडेनशियल डॉक्टरांच्या असोसिएशन तर्फे अटकेची मागणी करण्यात आली आहे.
कॉमेडियन सुनील पालने त्याच्या यूट्यूब अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे . व्हिडिओ मधे सुनील पाल याने डॉक्टरांन बद्दल वक्तव्य केल आहे की ”कोरोना रुग्णालयात काम कारणारे डॉक्टर चोर आहेत. कोरोना रुग्ण तपासणीच्या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते. कोरोना संक्रमित लोकांना मोठ्या प्रमाणात डॉक्टर लुबाडत आहेत. तसेच सुनील पालने अश्या डॉक्टरांचा भांडाफोड कण्यासाठी कोरोना रुग्ण वॉर्ड मध्ये कॅमेरा लावण्यात यावा. यामुळे डॉक्टरांनच पितळ उघड पडेल अशी मागणी सरकारकडे केली आहे”

- Advertisement -

सुनीलच्या  व्हिडिओ नंतर एम्स रुग्णालया मधील रेसीडेनशियल डॉक्टरांच्या असोसिएशनतर्फे सुनील पाल याच्या अटकेची मागणी गृहमंत्री अमित शहा यांना ट्विट करून लिहण्यात आली आहे. ”भारतातील कोरना व्हायरस  संपूर्ण नष्ट करण्याठी डॉक्टर्स आपला बळी देण्यासाठी सज्ज आहेत. आणि अशातच कॉमेडीयन सुनील पालने केलेल वक्तव्य आम्हाला मंजूर नाही . एपिडमिक अॅक्ट च्या अंतर्गत सुनील पाल याला अटक करण्यात याव अशी मागणी गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करून डॉक्टरांनी केली आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – ‘इल्‍लीगल’ सिरीजच्या दुसऱ्या पर्वाचे पुनरागमन

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -