Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'ला विनोदवीर विशाखा सुभेदारचा कायमचा गुड बाय

‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’ला विनोदवीर विशाखा सुभेदारचा कायमचा गुड बाय

Subscribe

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने अभिनेत्री विशाखा सुभेदार हिला संपूर्ण महाराष्ट्रात विनोदाची राणी अशी ओळख करून दिली. पण या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात अभिनेत्री विशाखा सुभेदार झळकणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा(maharashtrachi hasyjatra) हा कार्यक्रम घराघरात पहिला जातो. या कार्यक्रमाचे अनेक चाहते सुद्धा आहेत. या कर्यक्रमाने हास्याचा डबल धमाका महाराष्ट्रातल्या प्रेत्येक घरापर्यंत पोहोचवला. या कार्यक्रमातून अनेक कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यापैकीच एक चेहरा म्हणजे विनोदाची राणी विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदारने(vishakha subhedar) ४ वर्षांहून अधिक काळ या कार्यक्रमात काम करत प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने अभिनेत्री विशाखा सुभेदार हिला संपूर्ण महाराष्ट्रात विनोदाची राणी अशी ओळख करून दिली. पण या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात अभिनेत्री विशाखा सुभेदार झळकणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा – ‘तू एकच फोटो वारंवार पोस्ट केलास’… प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्याची भन्नाट कमेंट

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री विशाखा सुभेदार(vishakha subhedar) हिने महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी नियनय घेतला होता. त्या संदर्भांत विशाखाने सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा शेअर केली होती. विशाखा सुभेदारच्या या पोस्ट मुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र त्यानंतर विशाखा सुभेदार पुन्हा हास्यजत्रा या कार्यक्रमात पुन्हा झळकणार आहे असंही बोललं जातं होतं. पण आता मात्र विशाखा सुभेदार महाराष्ट्राची हास्यजत्रा(maharashtrachi hasyjatra) या कर्यक्रमाला कायमचा रामराम करणार आहे. विशाखा आता पुन्हा या कार्यक्रमात झळकणार नाही.

हे ही वाचा – लंडनहून येताना ‘या’ दोन गोष्टी नक्की घेऊन या’, प्रसाद ओककडे चाहत्याने केली भन्नाट मागणी

- Advertisement -

येत्या १५ ऑगस्ट पासून महाराष्ट्राची हास्यजत्रा(maharahstrachi hasyjatar) या कार्यक्रमाचे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या नवीन पर्वात अभिनेत्री विशाखा सुभेदार दिसणार नाही. विशाखाने या कार्यक्रमाला कायमचा रामराम केला आहे. पण त्या ऐवजी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात काही नवीन विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काहीच दिवसांपूर्वी या कार्क्रमाचे ५०० भाग पूर्ण झाले आणि त्या निमित्ताने मोठं सेलिब्रेशन सुद्धा करण्यात आले होते. प्रेक्षकांनी सुद्धा या कार्यक्रमाला ५०० नव्हे तर ५००० भाग पूर्ण होऊ देत अशा शुभेच्छा दिल्या. मात्र या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात विशाखा सुभेदार साहभागी होणार नाही या बातमीने मात्र त्यांच्या चाहत्यांना सुद्धा धक्का बसला आहे.

विशाखा सुभेदार यांची भावनिक पोस्ट –

“मला काही मोठं काम मिळालं नाहीय किंवा मी दुसरी मालिका करत नाही किंवा नवीन पिढी तयार होतेय हे सहन होत नाहीय असले घाण आरोपही कोणी लावू नका. कारण पिढ्या घडायलाच हव्या…! आणि आपली एक्सिट पण ध्यानात असायलाच हवी. “जा आत्ता “असं म्हणण्यापेक्षा. “अर्रर्रर्रर्र “हे ऐकायला जास्त छान वाटतं नाही कां..! फक्त आता वेगळ्या धाटणीचे काही करण्याचा विचार आहे. त्यामुळे लवकरच दुसऱ्या भूमिकेतून भेटू,” असे म्हटले होते.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम २०१८ पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचे नवे पर्व येत्या १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – चार वार हस्याचा चौकर’, असे या नव्या पर्वाचे नाव आहे. यात नक्की काय नवीन असणार याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच हे गुपित उलगडणार आहे. या नव्या पर्वात समीर चौगुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने, गौरव मोरे आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

हे ही वाचा – अभिनेत्री सई ताम्हणकर हॉट सीटवर; पाहा कोण होणार करोडपतीचा विशेष भाग

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -