घरताज्या घडामोडीकॉमेडियन सिद्धार्थ सागर पुन्हा ड्रग्जच्या आहारी; पोलिसांना भेटला अशा अवस्थेत

कॉमेडियन सिद्धार्थ सागर पुन्हा ड्रग्जच्या आहारी; पोलिसांना भेटला अशा अवस्थेत

Subscribe

कॉमेडी सर्कस फेम कॉमेडियन सिद्धार्थ सागर ड्रग्जच्या व्यसनातून बाहेर आल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे प्रेक्षकांच्या समोर आला होता. परंतु पुन्हा एकदा सिद्धार्थ सागर ड्रग्जचा शिकार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सिद्धार्थला व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी देखील सिद्धार्थला ड्रग्जचे खूप व्यसन होते. त्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थला बायपोलर डिसऑर्डर असून त्याच्यावर उपचार सुरू होते.

माहितीनुसार, गेल्या महिन्यात २९ वर्षी सिद्धार्थ पोलिसांना खूप खराब अवस्थेत सापडला होता. ज्यानंतर सिद्धार्थच्या आईला दिल्लीहून मुंबईला बोलावण्यात आले. डान्सर फराह खान जज असलेल्या कॉमेडी शोमध्ये सिद्धार्थ एक सदस्य होता. आता त्याची अवस्था बिघडल्यामुळे त्याची जागा जेमी लीवरने घेतली आहे.

- Advertisement -

एका वृत्तसंस्थेशी बोलताना सिद्धार्थची आई म्हणाली की, ‘पोलीस स्टेशनमधून त्यांना फोन आला होता. तुमचा मुलगा सिद्धार्थ सागरची प्रकृती बिघडली असून त्याला फक्त त्याचा नंबर आणि नाव माहित आहे. जेव्हा सिद्धार्थची अशी स्थिती झाली आहे, तेव्हा कोणीही त्याचा मित्र त्याच्या मदतीसाठी पुढे आला नाही.’

सिद्धार्थची आई पुढे म्हणाली की, ‘सिद्धार्थला बायपोलर डिसऑर्डरसाठी औषध सुरू केली होती. परंतु त्याने अचानक काम सोडले. त्यानंतर काही तरी बिघडले असल्याचे त्यांना समजले आणि त्यानंतर सिद्धार्थ पुन्हा एकदा ड्रग्जच्या आहारी गेल्याचे समजले.’

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी सिद्धार्थने आई-वडिलांवर विशेष म्हणजे त्याच्या आईवर बँक खात्यातून पैसे काढण्याचा आणि जबरदस्तीने ठेवल्याचा आरोप केला होता. परंतु गेल्या वर्षी एका मुलाखतीमध्ये त्याने आईने पाठिंबा देण्याचे आणि अंधारातून बाहेर काढण्याचे श्रेय देखील दिले.


हेही वाचा – Sidharth Shukla Death: सिद्धार्थला शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचली शेहनाज गिल, व्हिडिओ व्हायरल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -