कॉमेडी क्वीन भारतीने मुलाचं नाव काय ठेवलं? दोन महिन्यांनी केला खुलासा

मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीने बोलता बोलता तिच्या मुलाचं नाव सांगितलं.

maternity shoot of bharati singh

कॉमेडी क्वीन भारती सिंह आणि अभिनेता हर्ष लिंबाचिया यांच्या मुलाच्या नावासाठी त्यांचे अनेक चाहते प्रतिक्षेत होते. भारती तिच्या मुलाला लाडाने गोला असं म्हणते. पण त्याचं खरं नाव काय असेल याकडे तिचे चाहते लक्ष ठेवून होते. दरम्यान, भारतीने आता तिच्या मुलाचं नाव जाहीर केलं आहे. (Comedy Queen Bharti Revealed her child’s name after two months)

भारती आणि हर्ष लिंबाचिया यांनी आपल्या मुलाचं नाव लक्ष्य असं ठेवलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीने सहज बोलता बोलता तिच्या मुलाचं नाव सांगितलं.

हेही वाचाBharti singh : देशातील पहिली प्रेग्नंट अँकर असल्याचा भारती सिंगचा दावा; म्हणे…

एका व्हिडिओमध्ये ती म्हणते की, ‘आमच्या मुलाला त्याच्या आई-वडिलांनी काम करताना पाहण्याची सवय आहे. लक्ष्य जन्माआधीपासून काम करत आहे.’

भारतीच्या या वक्तव्यावरून तिने तिच्या मुलाचं नाव लक्ष्य ठेवलं असल्याचं समोर आलं आहे.


दोन महिन्यांनंतरही भारतीने आपल्या मुलाचा चेहरा समाजमाध्यमांवर दाखवलेला नाही. पण मुलाशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी हे कपल व्लॉग्सच्या माध्यमातून शेअर करत असतात. लाइफ ऑफ लिम्बाचियाज नावाच्या युट्यूब चॅनेलवरून हे व्हिडिओ प्रसिद्ध होत असतात. दरम्यान, भारती आणि हर्ष आपल्या मुलाला फर्स्ट ट्रिपसाठी गोव्याला घेऊन गेले होते. हर्ष आणि भारतीचं लग्न ज्या हॉटेलमध्ये झालं होतं, त्याच हॉटेलमध्ये ते त्यांच्या मुलाला घेऊन गेले होते.