घर मनोरंजन कॉमेडी सिरीज 'हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय'चा ट्रेलर झाला प्रदर्शित

कॉमेडी सिरीज ‘हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय’चा ट्रेलर झाला प्रदर्शित

Subscribe

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज आपल्या फॅमिली कॉमेडी सिरीज ‘हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय’चा रोमांचक ट्रेलर रिलीज करून जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे. या सिरीजमध्ये राज बब्बर, रत्ना पाठक शाह, अतुल कुलकर्णी, आयेशा जुल्कासह रौनक कामदार, मीनल साहू, सनाह कपूर आणि अहान साबू या कलाकारांना पाहायला मिळेल. आतिश कपाडिया आणि जेडी मजेठियाद्वारा निर्मित आणि दिग्दर्शित तसेच हॅट्स ऑफ प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित असलेली, ‘हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय’ही एक एपिसोडिक रिलीज असेल. पहिले चार भाग 10 मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर 240 पेक्षा अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रीमियर होणार असून, 31 मार्चपर्यंत दर शुक्रवारी 2 एपिसोड रिलीज होतील.

- Advertisement -

सिरीजचा हा ट्रेलर ढोलकियांच्या दुनियेत घेऊन जातो, जिथे एकाच घरात रहात असलेल्या ढोलकिया कुटुंबाच्या चार पिढ्यांना जीवनातील चढ-उतारांना एकत्र सामोरे जाताना पाहायला मिळेल. तसेच, जगासाठी भलेही ढोलकिया एक पिक्चर-परफेक्ट परिवार आहे परंतु इतर कोणत्याही कुटुंबाप्रमाणेच अकार्यक्षम असून, प्रत्येकाची स्वत:ची खास शैली, सूर आणि बोली आहे.

आतिष कपाडियाद्वारा लिखित ‘हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय’या सिरीजमध्ये स्वाती दास, अतुल कुमार, करियुकी मार्गरेट वांजीकू, परेश गनात्रा, प्रणोती प्रधान, समर वर्मन्नी आणि नेहा जुल्का यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

दीपिका पादुकोणची 95व्या ऑस्करमध्ये होणार एन्ट्री; पोस्ट शेअर करत दिली माहिती

- Advertisment -