घरमनोरंजनअर्जुन कपूरच्या 'कुत्ते'च्या तुलनेत मराठी 'वेड' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई

अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’च्या तुलनेत मराठी ‘वेड’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा बहुचर्चित कुत्ते चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी पासूनच हा चित्रपट चर्चेत होता. परंतु प्रदर्शनानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी केवळ 1.07 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 1.22 कोटी कमावले तर तिसऱ्या दिवशी 1.10 कोटी कमावले आहेत. या चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण 3.39 कोटी कमावले आहेत.

कुत्ते फिल्म रिव्यू

- Advertisement -

या चित्रपटाचे दिग्दर्शन आसमान भारद्वाज यांनी केले असून यात अर्जुन कपूर, तब्बू, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, राधिका मदान आणि कुमुद मिश्रा महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 50 कोटी बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

- Advertisement -

अशातच 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या‘अवतार : द वे ऑफ वॉटर’चित्रपट पाहण्यासाठी अजूनही प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर जवळपास 454 कोटींच टप्पा पार केला आहे. तर जगभरातून या चित्रपटाने 14060 कोटींचा टप्पा पार केला आहे.

वेड

कुत्ते चित्रपटाच्या तुलनेत मराठी सिनेसृष्टीतील ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहेत. या चित्रपटाने आत्तापर्यंत 47.92 कोटींची कमाई केली आहे. सैराट नंतर कमाई करणारा हा मराठीतील दुसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनिलिया मुख्य भूमिकेत आहेत.


हेही वाचा :

RRR ने दाखवला पुन्हा एकदा जलवा; ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज’ श्रेणीत पटकावला पुरस्कार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -