घरमनोरंजनअक्षय कुमारविरोधात तक्रार दाखल; भारताच्या नकाशावर चालणं पडलं महागात

अक्षय कुमारविरोधात तक्रार दाखल; भारताच्या नकाशावर चालणं पडलं महागात

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नेहमीच त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. विविध चित्रपटांच्या माध्यमातून अक्षय प्रेक्षकांचे मन जिंकत असतो. मात्र, मागील काही महिन्यांपासून अक्षयला विविध कारणांमुळे सतत ट्रोल केलं जातं. याचं कारणामुळे 2022 मधील अक्षयचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अक्षयने नॉर्थ अमेरिकेच्या टूर प्रमोशनचा एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात त्याने पृथ्वीवर चालताना भारताच्या नकाशावर पाय दिला होता. हे पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केले होते. अशातच आता अक्षयवर गृहमंत्रालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अक्षय कुमारने भारताच्या नकाशाचा अपमान केल्याने भावना दुखावल्याचा आरोप करत अधिवक्ता वीरेंद्र पंजाबी यांनी जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांसह गृहमंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना वकील म्हणाले की, अक्षय कुमारवर भारताच्या नकाशाचा अपमान केल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये पृथ्वीवर चालताना भारताच्या नकाशावर पाय देण्यात आला त्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावण्याचा आरोप करण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान, अक्षयच्या या व्हिडीओमध्ये अक्षयसोबत अभिनेत्री मौनी रॉय, दिशा पटानी, सोनम बाजवा आणि नोरा फतेही देखील दिसत आहेत. या व्हिडीओत हे सर्वजण पृथ्वीवर चालताना दिसत आहेत.


हेही वाचा :

विराट आणि जडेजाच्या डान्सवर शाहरुख म्हणतो; माझ्यापेक्षा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -