घरमनोरंजनतापसी पन्नूविरोधात इंदूरमध्ये तक्रार दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

तापसी पन्नूविरोधात इंदूरमध्ये तक्रार दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूविरोधात मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारकर्त्याने आरोप केला आहे की, तापसी पन्नूने हिंदू धर्माच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला असून यामुळे त्यांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या आहेत. दरम्यान, आता इंदूर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.

तापसी पन्नूने धार्मिक भावना दुखावल्या

छत्रीपुरा पोलिस स्टेशनचे SHO कपिल शर्मा यांनी सांगितले की, एकलव्य गौर यांच्याकडून एक अर्ज आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नूने फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करताना देवी लक्ष्मींची प्रतिमा असेलेले लॉकेट परिधान केले होते, तसेच यावेळी तिने रिवीलिंग ड्रेस परिधान केला होता. तापसीने देवीची प्रतिमा असेलेल्या जॉकेटसोबत रिवीलिंग ड्रेस घातल्याने त्यांच्या धार्मिक भावना आणि सनातन धर्माच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. याप्रकरणी तापसीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. दरम्यान, अद्याप याप्रकरणी तापसीकडून कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही.

- Advertisement -

‘डंकी’ चित्रपटात शाहरुखसोबत पहिल्यांदा दिसणार तापसी

दरम्यान, तापसी पन्नू यापूर्वी अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘दोबारा’ या चित्रपटात दिसली होती. मात्र, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता तापसी लवकरच शाहरुख खानसोबत ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे, प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तापसी पन्नू पहिल्यांदाच शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करत आहे.


 

- Advertisement -

हेही वाचा :

शाहरुखने खरेदी केली भारतातील सर्वात महागडी कार; नंबर प्लेटने वेधलं लक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -