घरमनोरंजनराखी सावंत आणि तिच्या वकील मैत्रिणीविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

राखी सावंत आणि तिच्या वकील मैत्रिणीविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

Subscribe

हिंदी टेलिव्हिनवर प्रसिद्ध असणारी राखी सावंत अनेकदा अनेकदा तिच्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी #MeeToo प्रकरणातील अभिनेत्री शर्लिन चोप्रा बद्दल राखीने काही विधान केले होते. दरम्यान, आता पुन्हा राखी सावंत नव्या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. राखीच्या अडचणीत आता वाढ होत असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राखी सावंत आणि तिची वकील फाल्गुनी ब्रम्हभट्ट यांच्या विरोधात एका महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

राखीच्या अडचणीत वाढ

- Advertisement -

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी सांगितलं की, तक्रार करणाऱ्या व्यक्तिने राखी आणि तिची वकील मैत्रिण वर आरोप केले आहेत की, या दोघींनी एका पत्रकार परिषदेदरम्यान, एक आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला आणि यावेळी आक्षेपार्ह शब्द देखील वापरले. त्यानंतर राखी आणि तिची वकील मैत्रिण फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांच्याविरोधात आयपीसी आणि आयटी कलमांखाली तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, याआधी देखील राखी अशा अनेक प्रकरणांमुळे चर्चेत आली आहे.

राखी सावंत आणि शर्लिन चोप्रामध्ये वाद
मागील काही दिवसांपूर्वी राखी आणि #MeeToo प्रकरणातील अभिनेत्री शर्लिन चोप्रामध्ये जोरदार वाद सुरु होता. याचं प्रकरणात शनिवारी राखीने आपल्या वकील मैत्रिणीसोबक अंधेरीतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये शर्लिन विरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर शर्लिनने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं होतं आणि सोबतच एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. राखी विरोधात ट्वीट करत शर्लिनने लिहिलं होतं की, “आमचा लढा लैंगिक शोषण आणि लैंगिक शोषण करणाऱ्यांविरोधात आहे. न्याय मागणे हा आपला घटनात्मक अधिकार आहे. आमच्याकडून हा अधिकार कोणीही हिसकावूण घेऊ शकत नाही. आमच्या आरोपींच्या बहिणींनी हे ऐकून समजून घ्यावे.”

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘बाप ऑफ ऑल फिल्म्स’मध्ये 90 च्या दशकातील ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसणार एकत्र

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -