घरमनोरंजनकुशलची कुशल कामगिरी

कुशलची कुशल कामगिरी

Subscribe

गायक, गीतकार, संगीतकार, वादक, निर्माता, वक्ता अशी ओळख जरी असली तरी संगीताच्या क्षेत्रात शास्त्रशुद्ध शिक्षण सुद्धा तेवढेच महत्त्वाचे मानले जाते. कुशल छेडा हा त्यापैकी एक संगीताची समज असलेला कलाकार आहे. अनेक वर्ष मुंबईत वास्तव्य केल्यानंतर कलेच्या प्रांतात स्थिर होण्यासाठी काय आवश्यक आहे हे त्याला उमगलेले आहे. आणि यामुळे कुशलने लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये संगीतात 3 पदव्या मिळवल्या असून मुंबई विद्यापीठातून आर्किटेक्ट विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. अलौकिक,अद्वितीय गुणवत्ता असलेल्या कुशलने सातत्याने अदिती सिंह शर्मा, शर्ली सेतिया, अभिजीत सावंत, भुवन बम, अंतरा मित्रा, जोनिता गांधी, या मान्यवर बॉलिवूड कलाकारांसोबत काम केले आहे. युट्युब वरच्या त्याच्या कवर साँगने 38 कोटी प्रेक्षकसंख्या मिळवली आहे. त्याने आपले पहिले पदार्पणाचे गीत ‘आजा बतला दू मैं’ नुकतेच रिलीज केले,ज्याची संगीत क्षेत्रात खूप प्रशंसा होत आहे. हे गाणे ऐकता क्षणीच गुणगुणावे असे आहे. कुशलची कुशल कामगिरी म्हणजे तो ‘कुशलमंगल’ या नावाने जास्त ओळखला जातो. जगणे म्हणजे आनंदी क्षणांचा कोलाज असून, हे क्षण आपल्या संगीतातून देण्याचा प्रयत्न करण्याचा ध्यास असल्याचे, कुशल सांगतो, तेव्हाच त्याच्या संगीताचे वेगळेपण विशेषत्वाने लक्षात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -