Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Vicky-Katrina Wedding: विक्की-कॅटच्या लग्नाबाबत कंडोम कंपनीची पर्सनल कमेंट; युजर म्हणाले, ओ भाई....

Vicky-Katrina Wedding: विक्की-कॅटच्या लग्नाबाबत कंडोम कंपनीची पर्सनल कमेंट; युजर म्हणाले, ओ भाई….

Subscribe

बॉलिवूडचे बहुचर्चित कपल विक्की कौशल आणि कतरिना कॅफ आज सात फेरे घेऊन पती, पत्नी होतील. आज विक्की आणि कतरिनाच्या नव्या आयुष्याला सुरुवात होईल. राजस्थानच्या सवाई माधोपूरच्या सिक्स सेंस फोर्ट बरवाडामध्ये विक्की आणि कतरिनाचा शाही विवाह सोहळ्यासाठी डोली सजली आहे. परंतु विक्की-कतरिनाच्या शाही विवाह सोहळ्यापूर्वी सोशल मीडियावर प्लेटफॉर्म्सवर अनेक मजेशीर मीम्स शेअर केले जात आहेत. आता यामध्ये लोकप्रिय कंडोम ब्रँड ड्यूरेक्ससुद्धा सामील झाला आहे.

कंडोम ब्रँड ड्युरेक्सने विक्की-कतरिनाच्या विवाहबाबत एक पोस्ट केली आहे. जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ड्युरेक्स इंडियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर लिहिले आहे की, ‘डियर विक्की आणि कतरिना. जर तुम्ही आम्हाला आमंत्रित केले नसेल तर तुम्ही मस्करी करत असाल.’ कंपनीच्या या पोस्टवर युजरच्या प्रतिक्रियांचा तुफान पाऊस पडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Durex India (@durex.india)

- Advertisement -

विक्की-कतरिनाला डेडीकेटेड कंडोम कंपनीच्या या पोस्टवर चाहते मज्या घेत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये हिलेरियस युजर्स रिअॅक्शन देत आहेत.

एका युजरने लिहिले आहे की, ‘ओ भाई साहेब..’तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘नेक्स्ट लेव्हर.’ तसेच आणखीन एका लिहिले की, ‘जास्तच पर्सनल होत आहे.’ तसेच बऱ्याच युजर्सनी हसणारे इमोजी पाठवले आहेत.

- Advertisement -

दरम्यान ओटीटीवरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म अॅमेझोन प्राईम व्हिडिओला विक्की-कतरिनाच्या लग्नाचे व्हिडिओ दाखवण्याचे राइट्स मिळाले आहेत. एका इंग्लिश वेबसाईटच्या माहितीनुसार, विक्की आणि कतरिनाने आपल्या लग्नाचे टेलिकास्ट राइट्स अॅमेझोन प्राईमला विकले आहेत. हे डील ८० कोटींमध्ये फायनल झाले आहे. यासाठी विक्की आणि कतरिनाने आपल्या पाहुण्याकडून एनडीए साईन केले आहे. जेणेकरून ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अगोदर लग्नाचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ नयेत.


हेही वाचा – विक्की – कतरिनाच्या वयातील अंतरावर कंगनाची कमेंट म्हणाली ‘बरं वाटलं…’


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -