सिद्धार्थ आणि तृप्तीच्या वैवाहिक आयुष्यात कलह? मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघेही एकत्र

सिद्धार्थ जाधवने त्याची मुलगी स्वराचा वाढदिवस साजरा केल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या फोटोंमध्ये सिद्धार्थची पत्नी तृप्ती सुद्धा दिसत आहे

मागील काही दिवसांपासून मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव यांच्या वैवाहित आयुष्याबाबत अनेक बातम्या समोर येत होत्या. सिद्धार्थ जाधव आणि तृप्तीचा घटस्फोट होणार असल्याचे देखील म्हटले जात होते. मात्र अजूनही दोघांनी काही खुलासा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबत अजूनही प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान सिद्धार्थ जाधवने त्याची मुलगी स्वराचा वाढदिवस साजरा केल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या फोटोंमध्ये सिद्धार्थची पत्नी तृप्ती सुद्धा दिसत आहे. तसेच सिद्धार्थने त्याची दुसरी मुलगी ईरा हिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तृप्ती सुद्धा दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सिद्धार्थची मुलगी ईरा ‘तमाशा LIVE’ चित्रपटातील रॅप साँग वर डान्स करताना दिसत आहे. ‘तमाशा LIVE’ चित्रपटातील हे रॅप साँग सिद्धार्थ जाधव यानेच गायले आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थच्या या गाण्याला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

हा व्हिडिओ शेअर करत सिद्धार्थ जाधवने त्याखाली “ईरा जाधव एण्जॉय, सिंगर #आपलासिद्धूचं रॅर साँग #बाप लेकीची मज्जा”. असं कॅप्शन दिलेलं आहे. सिद्धार्थ जाधव वारंवार आपल्या सोशल मीडियावर आपल्या मुलींबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

‘तमाशा LIVE’ आणि ‘दे धक्का २’ मध्ये झळकणार सिद्धार्थ जाधव
सिद्धार्थ जाधव लवकरच ‘तमाशा LIVE’ आणि ‘दे धक्का २’ या चित्रपटांमध्ये झळकणार असून त्याचे हे दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.