घरताज्या घडामोडीहॉकी टीमला शुभेच्छा देत फरहान अख्तर झाला ट्रोल, मिम्स होतायत व्हायरल

हॉकी टीमला शुभेच्छा देत फरहान अख्तर झाला ट्रोल, मिम्स होतायत व्हायरल

Subscribe

फरहानची ही चुक नेटकऱ्यांच्या नजरेस पडली आणि फरहानला ट्विटवर जबरदस्त ट्रोल करण्यात आले.

गुरुवारची सकाळी भरातीयांचे स्वप्न पूर्ण करणारी ठरली. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले. संपूर्ण देशात हा क्षण साजरा करण्यात आला. सोशल मीडियावर देखील भारतीय हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशाचे पंतप्रधान ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत सर्वच जण भारतीय पुरुष हॉकी संघाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा देत होते. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने देखील भारतीय हॉकी संघाला ट्विटवर शुभेच्छा दिल्या. मात्र शुभेच्छा देताच फरहान अख्तरला ट्विटवर ट्रोल करण्यात आले. हॉकी संघाला शुभेच्छा देत फरहान अख्तरने केलेली एक छोटी चुक फरहानला चांगलीच महागात पडली आणि त्याला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. उत्साहाच्या भरात फरहाने पुरुष हॉकी संघाऐवजी महिला हॉकी संघाला जिंकल्याच्या शुभेच्छा दिल्या. फरहानची ही चुक नेटकऱ्यांच्या नजरेस पडली आणि फरहानला ट्विटवर जबरदस्त ट्रोल करण्यात आले. (Congratulating the hockey team, Farhan Akhtar became a troll, mimes viral)

फरहान अख्तरने महिला हॉकीला संघाला दिलेल्या शुभेच्छा 

- Advertisement -

फरहान अख्तरचे ट्विट पोस्ट होताच नेटकऱ्यांनी त्याचे स्क्रिनशॉट्स काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. फरहान अख्तरला त्याची चुक लक्षात येताच त्याने पुढील ३ मिनिटात ट्विट डिलिट केले. मात्र त्याच्या ट्विटचे स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल झाले आणि या ट्विटर मिम्सचा पाऊस पडला. फरहानने त्यानंतर आता फरहानने पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा देणारे ट्विट केले. मात्र त्याचे चुकलेले ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फरहान अख्तरच्या ट्विटवरचे काही भन्नाट मिम्स

- Advertisement -


हेही वाचा – कांस्य पदकाच्या लढतीत पराभूत झालेल्या महिला संघाला शाहरुखने ‘चक दे इंडिया’ स्टाईलने दिला धीर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -