दिया मिर्जा लवकरच अडकणार लग्न बंधनात

१५ फेब्रुवारीला पार पडणार विवाहसोहळा

diya mirza
दिया मिर्झा

आजकाल बॉलिवूडमधून एक-एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळत आहे. अनुष्का आई झाल्यापासून ते वरुण धवनच्या लग्नापर्यंत अनेक आनंदाच्या बातम्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना दिल्या. दिया मिर्झा बद्दलही आता एक चांगली बातमी समोर आली आहे.

दिया मिर्झा ही देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दीया मिर्झा १५ फेब्रुवारी रोजी बिसनेसमॅन वैभव रेखी सोबत सप्तपदी घेणार आहे. लग्न सोहळा फक्त जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत होईल. याचा अर्थ हा एक खासगी कार्यक्रम असेल, ज्यामध्ये दोन्ही कुटुंबातील जवळपासचे नातेवाईक उपस्थित राहतील. वैभव रेखी हा मुंबई येथील व्यावसायिक असून वांद्रे येथील पाली हिल भागात राहतो.

दियाचे पहिले लग्न साहिल संघा याच्याशी झाले होते, ११ वर्षा एकत्र राहिल्यानंतर २०१९ मध्ये दिया मिर्झा आणि साहिल या दोघांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात ते म्हणाले होते की “आम्ही वेगळे होणार आहोत पण आमचे नातं कायमच मैत्रीपूर्ण असेल. आम्ही कायदेशीररित्या वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. पण आम्ही नेहमीच चांगले मित्र राहून एकमेकांचा आदर करु.”