‘महाराष्ट्र ही वैचारीक दडपशाही खपवून घेणार नाही’, बाळासाहेब थोरात अभिनेते किरण मानेंच्या पाठीशी

मालिकेतून काढून टाकणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असून त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकारावर घाला घालण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्र ही वैचारीक दडपशाही खपवून घेणार नाही. स्टार प्रवाह वाहिनीने आपली चुक सुधारावी

congress leader Balasaheb Thorat support actor Kiran Mane mulgi jhali ho star pravah
महाराष्ट्र ही वैचारीक दडपशाही खपवून घेणार नाही, बाळासाहेब थोरात अभिनेते किरण मानेंच्या पाठीशी

स्टार प्रवाहवरील ( Star Pravah )  मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho)  या प्रसिद्ध मालिकेतील विलास (Vilas Patil)  म्हणजेच अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane )  यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडल्याने त्यांना स्टार प्रवाह वाहिनीने हा निर्णय घेतला. या प्रकरणानंतर अनेक स्तरातून प्रतिक्रीय समोर आल्या. अनेक राजकीय नेत्यांनी देखील किरण मानेंना पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी ट्विट करत किरण मानेंसोबत झालेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत स्टार प्रवाह वाहिनीला इशारा दिला आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत त्यांची प्रतिक्रीया दिलीय त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेय, ‘किरण माने कलाकारांने राजकीय मत व्यक्त केले म्हणून त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असून त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकारावर घाला घालण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्र ही वैचारीक दडपशाही खपवून घेणार नाही. स्टार प्रवाह वाहिनीने आपली चुक सुधारावी’, असा इशारा त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीला दिला आहे.

किरण माने यांना स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्यानंतर त्यांनी फेसबुकवर ‘काँट लो जुबान, आसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!’ अशी पोस्ट केली.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना किरण माने यांनी त्यांनी घेतलेल्या एका राजकीय भूमिकेमुळे त्यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्याचे त्यांनी सांगितले. किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीने काढून टाकल्याची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय. कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चॅनेलकडून मुस्कटदाबी होते असल्याचा तीव्र प्रतिक्रीय चाहत्यांकडून येत आहेत.

किरण माने म्हणाले की, “ही झुंडशाही अशीच सुरु राहणार आहे. त्यामुळे शिवबा- तुकोबांच्या आणि शाहु-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडंलय. मात्र या महाराष्ट्रात अशी झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. जर मला न्याय मिळाली नाही तर झुंडशाहीविरोधात बोलणार मी मागे पुढे पाहणार नाही हे तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोकं याविरोधात बोलण्यास समोर येतील. त्यामुळे काय करायचे हे लोकांनी ठरवावे. परंतु माझ्य़ा कोणत्याही पोस्टमध्ये मी जातीवादावर, विनाकारण पातळी सोडून टीका केलेली नाही.” Kiran Mane : इंदिरा गांधींवर टीका करायचो, पण तेव्हा अशी दहशत नव्हती, किरण मानेंचा संताप


हेही वाचा – ‘कोन नाय कोन्चा…’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य मनसेला मान्य?, अमेय खोपकर मांजरेकरांच्या पाठीशी