Aryan Khan Drugs Case: काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी शाहरुख खानला लिहिले पत्र

congress leader rahul gandhi wrote letter to shahrukh khan when his son aryan khan was in jail for cruise drugs case
Aryan Khan Drugs Case: काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी शाहरुख खानला लिहिले पत्र

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यादरम्यान बॉलिवूड स्टार शाहरुख खानला अनेक लोकांनी पाठिंबा दिला. यामध्ये चित्रपटसृष्टीसंबंधित कलाकारांव्यतिरिक्त राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा देखील समावेश होता. यादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील शाहरुखला पाठिंबा देण्यासाठी पत्र लिहिले होते. राहुल गांधी यांनी शाहरुखला हे पत्र आर्यनला आर्थररोड जेलमध्ये पाठवल्यानंतर सहा दिवसांनंतर म्हणजेचे १४ ऑक्टोबरला लिहिले होते. यावेळेस कोर्टाने २३ वर्षीय आर्यनला जामीन देण्यास नकार दिला होता.

सुत्रांच्या माहितीनुसार, संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे, असे राहुल गांधी यांनी पत्रातून शाहरुख खानला लिहिले होते. दरम्यान २८ ऑक्टोबरला मुंबई हायकोर्टाने आर्यनचा जामीन मंजूर केला. त्यानंतर जामिनाचे कागदपत्र जेलपर्यंत पोहोचण्यासाठी शनिवार आला. शनिवारी आर्यनला जामीन मिळाला. क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला जवळपास एक महिना जेलमध्ये काढावे लागले. एनसीबीने २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारी करून आर्यन खानला अटक केली होती.

कोर्टामधील युक्तीवादातून आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचे सांगितले गेले. परंतु एनसीबीने दावा केला होता की, आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून तो ड्रग्ज तस्करीमध्ये सामिल होता असे सिद्ध झाले होते. तसेच या ड्रग्ज प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन होते असे देखील समोर आले होते. हायकोर्टाने म्हटले की, आरोपींपैकी एकाने आर्यनला ड्रग्जचा पुरवठा केल्याचे सिद्ध करण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅट पुरेसे नाही आहे. आर्यनला जेव्हा जामीन मिळाला तेव्हा तो शाहरुखसोबत मन्नतवर पोहोचला. यावेळी शाहरुखच्या चाहत्यांनी आर्यन सुटल्यानंतर मन्नतवर त्याचे जल्लोषात स्वागत केले होते.


हेही वाचा – Cruise Drug Case : आर्यन जामीन प्रकरण, शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा CCTV व्हिडिओ SIT पथकाच्या हाती