घरमनोरंजनसई पल्लवीच्या काश्मिरी पंडितांच्या हत्येसंबंधित वक्तव्यावर वाद पेटला

सई पल्लवीच्या काश्मिरी पंडितांच्या हत्येसंबंधित वक्तव्यावर वाद पेटला

Subscribe

नुकत्याच या चित्रपटाच्या एका इवेंट दरम्यान सई पल्लवीने काश्मीरी पंडितांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, ज्यानंतर आता सोशल मीडियावर नव्या वादाची ठिणगी पेटली आहे

साउथ चित्रपटसृष्टीची सुप्रसिद्ध अभिनेत्री सई पल्लवी तिच्या बेधडक अंदाजामुळे आणि सुंदर अभिनयामुळे ओळखली जाते. सध्या सई पल्लवी तिच्या आगामी ‘विराट पर्वम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या सई पल्लवी तिच्या ‘विराट पर्वम’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या एका इवेंट दरम्यान सई पल्लवीने काश्मीरी पंडितांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, ज्यानंतर आता सोशल मीडियावर नव्या वादाची ठिणगी पेटली आहे.

सई पल्लवीच्या वक्तव्यावर वाद
सई पल्लवीने आपल्या नुकत्याच एका इंटरव्यूमध्ये बॉलिवूडमधील ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटात काश्मीरी पंडितांवर दाखवलेला अत्याचार आणि हत्येची तुलना मॉब लिचिंगसोबत केली आहे. सई पल्लवीच्या या विधानावरून सोशल मीडियवर आता नवा वाद सुरू झालेला आहे. सई पल्लवीच्या विधानाचे काही जण समर्थन करत आहेत तर, काही जण तिच्या वक्तव्याचा विरोध करत आहेत.

- Advertisement -

 एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सई पल्लवी म्हणाली की, मी एका चांगल्या वातावरणामध्ये मोठी झाले आहे. मी लेफ्ट विंग आणि राइट विंगबद्दल ऐकलं आहे. मात्र मी हे नाही सांगू शकत की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं.

 सई पल्लवी पुढे म्हणाली की, द काश्मीर फाइल्स चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं की कशा प्रकारे काश्मीरी पंडितांची हत्या करण्यात आली आहे. तसेच काही काळापूर्वी गाय घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम माणसाला अत्यंत विकृत पद्धतीने मारून जबरदस्तीने त्याच्या तोंडून जय श्री राम ही घोषणा करण्यास सांगितली. मग ही सुद्धा धर्माच्या नावावर एक प्रकारची हिंसाच आहे. मग या दोन्ही घटनांमध्ये काय फरक आहे?

- Advertisement -

 या इंटरव्यूमध्ये सई पल्लवीने सांगितले की, तिच्या कुटुंबातून तिला एक चांगला माणूस बनण्याची शिकवन दिली आहे. तसेच मी नेहमी तटस्थ राहणं पसंत करते आणि पीडितांसाठी उभं राहण्याचा प्रयत्न करते. सध्या सई पल्लवीचा हा इंटरव्यू खूप व्हायरल होत असून सई पल्लवीच्या विधानाचे काही जण समर्थन करत आहेत तर, काही जण तिच्या वक्तव्याचा विरोध करत आहेत.


हेही वाचा :बाळाने जन्म होताच गमावला जीव, बी प्राकने जड अंतःकरणाने लिहिली ही पोस्ट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -