घरमनोरंजनSiddharth Shukla death: सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण लवकरच कळणार! कूपर हॉस्पिटलने पोलिसांना दिला...

Siddharth Shukla death: सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण लवकरच कळणार! कूपर हॉस्पिटलने पोलिसांना दिला पोस्टमार्टम रिपोर्ट

Subscribe

‘बिग बॉस 13’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे काल, गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आणि आज त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. दरम्यान, आज अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल (Post mortem Report) कूपर हॉस्पिटलने मुंबई पोलिसांकडे सोपवला आहे. त्यामुळे लवकरच अवघ्या ४० वर्षांच्या सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण सर्वांसमोर येईल. मिळालेल्या अहवालात सिद्धार्थच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत, असे ओशिवरा पोलीस स्टेशनमधील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अहवाल ५ डॉक्टरांच्या टीमने तयार केला आहे. ३ पोस्टमार्टम तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याचे पोस्टमार्टम केले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणात कोणताही हलगर्जीपणा करणार नाही आणि सिद्धार्थचा व्हिसेरा फॉरेन्सिक तपासणीसाठी कलिना फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येईल. यानंतर हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्ट येथून आल्यानंतर हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला की इतर काही कारणांमुळे हे स्पष्ट होईल. मुंबई पोलिसांकडून फक्त एवढेच सांगण्यात आले आहे की, आम्ही कोणत्याही अंतिम निर्णय घेणार नाही. आम्ही अद्याप केमिकल आणि एनालिसिस अहवालाच्या प्रतिक्षेत आहोत.

- Advertisement -

सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून ब्रह्मा कुमारी जुहू कार्यालयात नेण्यात येईल, तिथे पूजा केल्यानंतर त्याचे पार्थिव ओशिवारा भागातील घरी आणले जाईल. सिद्धार्थ शुक्लाच्या घराबाहेर पोलीस तसेच खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर पोस्टर लावून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यापूर्वी सिद्धार्थचा देह अंतिम दर्शनासाठी अंधेरी येथील लोखंडवालामधील सेलिब्रेशन क्लब येथे ठेवण्यात येणार आहे.


देशातील ४०० रेल्वे स्थानकांचा होणार पुनर्विकास; खासगी ऑपरेटर चालवणार ९० पॅसेंजर ट्रेन
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -