Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Effect: बॉलीवूडकरांनाही कोरोनाचा फटका, घर-दार विकायची आली वेळ

Corona Effect: बॉलीवूडकरांनाही कोरोनाचा फटका, घर-दार विकायची आली वेळ

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या फटका हा फक्त सर्वसामान्यांवर झाला नसून झगमगत्या दुनियेवर झाला आहे. बॉलिवूड कलाकरांच्या लाईफस्टाईलचे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत. अक्षरशः काही कलाकारांना आपले घर-दार विकायची वेळ आली आहे. तर काही कलाकारांनी आपल्या सुरक्षेत कपात केली आहे. कोरोनाच्या काळात कोणतेही काम असल्यामुळे कमाईचा मार्ग बंद झाला. यामुळे अनेक कलाकारांनी शेअर मार्केट, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा मार्ग निवडला आहे.

कोरोनाच्या काळात फक्त मजुरच नाहीतर अनेक कलाकार बेरोजगार झाले असे म्हणण्यास काही हरकत नाही आहे. जर बडे कलाकार सोडले तर अनेकांना कलाकारांना कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनाच्या काळात अनेक चित्रपट, मालिकाचे शूटिंग थांबले. त्यामुळे कलाकारांची रोजीरोटी गेली. लॉकडाऊन दरम्यान काही कलाकारांनी छोट-छोटे व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्यामुळे यंदा तरी कोरोनाचे संकट जाईल, अशी आसा कलाकारांना होती. पण फेब्रुवारी महिन्यांपासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. मार्च महिन्यात कोरोनाचा पुन्हा कहर वाढू लागला. त्यामुळे पुन्हा एकदा निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. बडे कलाकार नैराश्यातून जात आहेत, तर छोटे कलकारांना कसे कमवायचे? याची चिंता सतावू लागली आहे. सगळे गणित विस्कटले आहे. काहींना प्रॉपर्टी विकायची वेळ आली आहे, तर काही जण पुन्हा आपल्या गावी परतत आहेत, अशी माहिती एका ज्येष्ठ अभिनेत्याने दिली.

- Advertisement -

२०२० साली फक्त ४४१ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याने उत्पन्नात ८० टक्के घट झाली. गतवर्षी मनोरंजनसृष्टीची एकूण कमाई २४ टक्क्यांनी घटली, असे फिक्कीच्या अहवालातून समोर आले आहे. वर्षभरापासून रेड कार्पेट सोहळे बंद असल्यामुळे कलाकारांनी डिझायनरकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे डिझायनर्सना आपला स्टुडिओ चालवणे कठीण झाले आहे.


हेही वाचा – बॉलीवूडला कोरोनाचा घट्ट विळखा, आता गोविंदा झाला कोविड पॉझिटीव्ह


- Advertisement -

 

- Advertisement -