घरताज्या घडामोडी'मला मुलांची आठवण येतेय', कोरोना पॉझिटिव्ह Kareena मुलांच्या आठवणीत भावूक

‘मला मुलांची आठवण येतेय’, कोरोना पॉझिटिव्ह Kareena मुलांच्या आठवणीत भावूक

Subscribe

अभिनेत्री करिना कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सध्या क्वारंटाइन आहे. क्वारंटाइन असल्याचे करिना तिच्या मुलांपासून दूर आहे. या दिवसात करिनाला तैमून अली खान आणि जहांगीर अली खानची आठवण येत आहे. करिनाने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत मुलांची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. करिनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलेय ‘मला कोरोनाचा तिरस्कार आहे. मला माझ्या मुलांची फार आठवण येत आहे. पण आपण लवकरच भेटू’. करिनाने पोस्टमध्ये एक इमोशनल इमोजी देखील शेअर केला आहे.

- Advertisement -

करिनाला करण जोहरने आयोजित केलेल्या एका पार्टीत कोरोनाची लागण झाली. त्यानंतर करिनाने स्वत:ला होम क्वारंटाइन केले आहे. करिनावर उपचार सुरू असून करिना उपचारांना प्रतिसाद देत आहे. करिनाच्या प्रकृतीमध्ये हळू हळू सुधारणा होत आहे. करिना पती सैफ अली खान देखील करिनाची फार काळजी घेत आहे. करिनाने काही दिवसांआधीच सैफचा बालकनीतील फोटो शेअर होता. ज्यात सैफ हातात कॉफी मग घेऊन उभा होता. या फोटोनंतर क्वारंटाइन करिनाची सैफसोबत कॉफी डेट झाली अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या होत्या.

करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये करिना आणि तिची खास मैत्रीण अमृता अरोराला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर दोघींची घरे मुंबई पालिकेकडून सील करण्यात आली होती. करिना कपूर पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी केली असता तिच्या घरातील मोलकरीण कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तसेच पार्टीत असलेल्या महीम कपूर सह सीमा खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. अभिनेत्री शनाया कपूरने देखील ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. केवळ करण जोहर,मलायका अरोरा आणि आलिया भट्ट यांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला.

- Advertisement -

हेही वाचा – नोरा, जॅकलीननंतर श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टीचेही सुकेश चंद्रशेखरबरोबर कनेक्शन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -