घरताज्या घडामोडीCorona Restriction : कसं परवडणार? संदीप पाठकने निर्बंधांवर व्यक्त केला संताप

Corona Restriction : कसं परवडणार? संदीप पाठकने निर्बंधांवर व्यक्त केला संताप

Subscribe

कोरोना महामारीनंतर जवळपास दोन वर्षांनी नाट्यगृहे, चित्रपट गृह सुरु झाले, मात्र कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे पुन्हा लागू होणाऱ्या निर्बंधांचा फटका कलाकारांना सहन करावा लागणार आहे. याच निर्बंधांवर आता मराठी अभिनेता संदीप पाठक यांने संताप व्यक्त केला आहे.

मुंबईसह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशात पुन्हा लॉकडाऊन लागतयं की काय अशा चर्चांना उधाण आले आहे. यात शाळा-कॉजेल बंद करण्यात आले. त्यामुळे मुंबई लोकलवरही निर्बंध लागू होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. यात सर्व गोष्टींवर निर्बंध लागू झाल्यास मनोरंजन विश्वही निर्बंधांत अडकेल असे बोलले जात आहे. कोरोना महामारीनंतर जवळपास दोन वर्षांनी नाट्यगृहे, चित्रपट गृह सुरु झाले, मात्र कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे पुन्हा लागू होणाऱ्या निर्बंधांचा फटका कलाकारांना सहन करावा लागणार आहे. याच निर्बंधांवर आता मराठी अभिनेता संदीप पाठक यांने संताप व्यक्त केला आहे. याबाबत संदीपने ट्वीट केले असून,त्याची चर्चा सोशलमिडियावर मोठ्या प्रमाणात आहे.

- Advertisement -

अभिनेता संदीप पाठक याचे वऱ्हाड निघाले लंडनला या नाटकाचे प्रयोग राज्यभरात सुरु आहे. मात्र कोरोना संसर्गा वाढल्याने नाट्यगृहे फक्त ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, ज्यामुळे बहुतांश राज्यात नाटकाचे प्रयोग रद्द होत आहेत. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या ठिकाणचे वऱ्हाड निघाले लंडनला नाटकाचे प्रयोग रद्द झाले आहे. यामुळे पुन्हा याचा आर्थिक फटका मनोरंजन विश्वाला सहन सहन करावा लागणार आहे. यामुळे सरकारच्या कोरोना निर्बंधांवर आणि निवडणुकांवर संदीपने टीका केली आहे.कोल्हापूर भागात नाट्यगृहात 50% आसनक्षमतेच्या ऐवजी फक्त 50 प्रेक्षकांना परवानगी. कसं परवडणार? म्हणून आम्ही कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी ह्या ठिकाणचे वऱ्हाडचे प्रयोग रद्द करत आहोत. क्षमस्व असं पहिलं ट्वीट संदीप पाठकने केले आहे.

- Advertisement -

यानंतर लगेच दुसरं ट्विट करत त्याने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लादण्यात येणाऱ्या निर्बंधांवर तीब्र संताप व्यक्त केला आहे. निवडणूक काळात कोरोनाचा कोणता नवा व्हेरिएंट येईल? की निकाला लागेपर्यंत कोरोनाचे व्हेरिएंट लपून बसतील? माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न…मास्क वापरण्याचा निर्णय आम्हा सामान्यांकरिता, सामाजिक अंतर राखण्याचा नियमही  आम्हा सामान्यांकरिता.. असं ट्वीट त्याने केले आहे.दरम्यान, संदीप पाठकने केलेल्या या दोन्ही ट्वीटवर अनेकांकडून प्रतिक्रिया येत आहे.


हेही वाचा – Punjab Election 2022 : सोनू सूदला पंजाबचा स्टेट आयकॉन पदावरून हटवले; वाचा काय आहे कारण?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -