घरताज्या घडामोडीCorona Vaccination: बॉलिवूड निर्माता आणि लेखकांना मिळणार मोफत लस

Corona Vaccination: बॉलिवूड निर्माता आणि लेखकांना मिळणार मोफत लस

Subscribe

बॉलिवूडमधील निर्मात्यांची सर्वात मोठी संस्था ‘इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन’ने (IMPPA) आपल्या संस्थेशी जोडलेल्या निर्माता सदस्यांच्या लसीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व निर्माता सदस्यांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा एम्पाने केली.

एम्पाच्या माहितीनुसार, २००५ नंतर कोणत्याही कारणास्तवर कोणताही निर्माता आपली सदस्यत्वाचे नुतनीकरण करू शकला नसेल तरही तो सदस्य या मोहिमेअंतर्गत मोफत लस घेण्यास पात्र असेल. पण जर निर्माताला आपल्या व्यतिरिक्त कोणत्याही इतर सदस्याला म्हणजे पती किंवा पत्नीला लस द्यायची असेल तर त्यासाठी ५०० रुपये द्यावे लागतील.

- Advertisement -

यादरम्यान स्क्रीन रायटर्स असोसिएनने (SWA) जगातील सर्वात मोठे ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या सहकार्याने बॉलिवूड लेखांचे मोफत लसीकरण करण्याचा पुढाकार घेतला आहे. एसडब्यूएने म्हटले की, सध्या त्याच्याकडे १००० लसीचे डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे लस घेण्यासाठी पहिल्यांदा या आणि पहिल्यांदा घ्या. एसडब्यूए आणि नेटफ्लिक्सकडून लस मिळण्याची व्यवस्था मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील लसीकरण केंद्रात केली जाईल. तसेच निर्मात्यांना लस घेण्यासाठी एम्पाच्या अंधेरी ऑफिसला जावे लागेल.

महत्त्वाचे म्हणजे बॉलिवूड निर्माता आणि लेखकांना मोफत लस घेण्यासाठी दिलेल्या फॉर्मवर आधार कार्ड व्यतिरिक्त वैयक्तिक माहिती द्यावी लागले. ज्यानंतर मोफत लसीकरणाचा लाभ घेऊ शकता.

- Advertisement -

हेही वाचा – मानसिक,शारीरिक स्वास्थ्यासाठी अमृता खानविलकरचे योगाचे धडे!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -