घरताज्या घडामोडीCorona Vaccination: बॉलिवूडच्या भाईजानने घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

Corona Vaccination: बॉलिवूडच्या भाईजानने घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

Subscribe

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने रमजान ईदचे औचित्य साधून मुंबईत कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. सलमान खान लस घेण्यासाठी पोहोचला, तेव्हाचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लसीचा दुसरा डोस घेताना सलमान खानसोबत भाऊ सोहेल खानही होता. सलमानने कोरोना लसीचा पहिला डोस मार्चमध्ये घेतला होता.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सलमानचा लसीकरण केंद्रातील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, सलमान खान मुंबईतील दादर भागातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी पोहोचला होता. यादरम्यान लोकांची गर्दी होऊ नये म्हणून खूप घाई करताना दिसत आहे. सलमानला पाहून तिथे उपस्थितीत असलेली मुलगी ओरडायला लागते आणि म्हणते सल्लू लव्ह यू.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोनाचा शिकार झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींना कोरोना लस घेतली आहे. यामध्ये अभिनेता संजय दत्त, सैफ अली खान, राकेश रोशन, हेमा मालिनी, कमल हासन, सतीश शाहा, शिल्पा शिरोडकर, जॉनी लिव्हर आणि मेहना नायडूसह अनेक सेलिब्रिटींनी कोरोनाची लस घेतली आहे.

यावर्षी ईद निमित्ताने सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट गुरुवारी चित्रपटगृहात आणि ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला अनेकांची पसंती मिळत आहे. पण काही जण चित्रपटाविरोधात बॉयकॉट राधेचा ट्रेंड चालवत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमाविरोधात ट्विटरवर #BoycottRadhe चा ट्रेंड सुरु


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -