Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन हॉट अवतारात मलाईकाने घेतली कोरोना लस

हॉट अवतारात मलाईकाने घेतली कोरोना लस

मलायकाने नुकताच कोरोना लसीचा डोस घेतला आहे. यासंबंधी एक फोटो तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत आरोग्य कर्मचारी मलायकाला कोरोनाचा लस देताना दिसत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ग्लॅमर फोटो आणि खास लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. वयाच्या ४७ व्या वर्षीही मलायका इतकी मैंनटेन दिसते. प्रत्येकजण तिच्या फिटनेसचा वेडा आहे. मलायका सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत तिच्या घायाळ अदांनी ती तिच्या चाहत्यांना भूरळ घालत असते. मलायकाने नुकताच कोरोना लसीचा डोस घेतला आहे. यासंबंधी एक फोटो तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत आरोग्य कर्मचारी मलायकाला कोरोनाचा लस देताना दिसत आहे. यावेळीही ती ग्लॅमरस लूकमध्ये प्रेक्षकांच्या समोर आली. लस घेतानाचा फोटो शेअर करत मलायकाने असे लिहिले आहे की, आज मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, आपण पूर्णपणे #wereinthist योध्दांनो, या #waragainstvirus मिळून जिंकूया. लवकरच लस घेण्यास विसरु नका! आणि हो मी लस घेण्यास पात्र आहे असे कॅप्शन देत मलायकाने ही पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

- Advertisement -

१ एप्रिल पासून ४५ वर्षाच्या वरील सर्व लोकांना लसीकरण सुरु झाले आहे. मलायकानेही याला जराही उशीर न करता कोरोना लस घेतली आहे. मलायकाला ही कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीतही मलायकाने शक्य तितकी सावधगिरी बाळगत कोरोना लसीचा डोस घेतला आहे.


हे वाचा- लग्नाच्या दोन महिन्यानंतर दिया मिर्झाने दिली ‘गुड न्यूज’ नेटकऱ्यांनी केले ट्रोल

- Advertisement -