घरट्रेंडिंगCoronavirus : 'ही' आहे करोनावर आधारीत चित्रपटांची यादी!

Coronavirus : ‘ही’ आहे करोनावर आधारीत चित्रपटांची यादी!

Subscribe

निर्माती क्रिश्ना लुल्लाने 'करोना प्यार है' हे शीर्षक नुकतेच रजिस्टर केले आहे.

देशात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. करोनाग्रस्तांची संख्या भारतात ११० झाली आहे. सध्या जगभरात ९९ देश करोनाच्या दहशतीखाली आहे. करोना विषाणूचा फटका मनोरंजन विश्वालाही बसला आहे. १९ ते ३१ मार्चपर्यंत चित्रपट, मालिका, वेबसिरीजचे शुटींग बंद ठेवण्यात आले आहे. मात्र अशातच या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चित्रपट निर्मिती करण्यासाठी निर्मात्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. करोनाशी संबंधित चित्रपटाचे शीर्षक नोंदवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढउतार सुरू आहे. यात नुकतेच ‘करोना प्यार है’ हे नाव रजिस्टर करण्यात आले आहे. निर्माती क्रिश्ना लुल्लाने ‘करोना प्यार है’ हे शीर्षक नुकतेच रजिस्टर करण्यात आले आहे.

- Advertisement -

निर्माती क्रिश्ना लुल्ला यांच्या ‘इरॉस इंटरनॅशनल फिल्म्स’ने या नावाची नोंदणी केली आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एक प्रमेकथा या चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याच समजत आहे. या आधी याच शीर्षकाखाली २००० मध्ये हृतिक रोशन व अमिषा पटेल यांचा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. आता याच चित्रपटाची कथा पुढे नेत ‘करोना प्यार है’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आतापर्यंत ‘करोना प्यार है’ या व्यतिरिक्त ‘वुहान वेपन करोना’, ‘करोना द ब्लॅक डे’, ‘करोना द इमर्जन्सी’, ‘डेडली करोना’ यांसारख्या चित्रपटांच्या नावांची नोंदणी झालेली आहे. कारण आत्ताजरी चित्रीकरण थांबवण्यात आले असले तरी भविष्यात होणाऱ्या चित्रपट निर्मीतीसाठी अत्ताच करोनावर आधारीत चित्रपटांची नावं रजिस्टर करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Corona Update: येत्या गुरूवारपासून ३१ मार्चपर्यंत मालिका,चित्रपटांचे चित्रीकरण रद्द


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -